June 24, 2021
पिंपरी चिंचवड राजकारण

पावसाळ्यापूर्वी होणार शहरातील रस्ते दुरुस्ती,नाले,ड्रेनेज सफाईचे काम,आयुक्तांनी दिले आदेश,दिपक मोढवे यांनी केली होती मागणी!!!

चिंचवड :प्रतिनिधी

शहरातील पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन नियोजनबध्द पध्दतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाला दिले. यासाठी सातत्याने स्थळ पाहणी करुन पावसाच्या पाण्याचा त्वरीत निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आदेशही आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

पावसाळ्यात उद्भवणा-या परिस्थितीचा विचार करुन महापालिकेने नियोजन केले असून विभागवार कामकाजाच्या जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत. सर्व कामे गतीने आणि समन्वयाने वेळेत पार पाडावीत यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्रपणे आदेश निर्गमित केला आहे.

पावसाळ्यातील प्राधान्याने करावयाच्या कामासाठी सर्वेक्षण करुन कालबध्द कार्यक्रमाची आखणी करुन सर्व साफसफाई वेळेत होईल याची काळजी घ्यावी. सफाईनंतर काढलेल्या कच-याची तात्काळ विल्हेवाट लावावी. जुने कपडे, गाद्या, प्लास्टीक पिशव्या, झाडांच्या फांद्या, भंगार माल, कचराकुंडीत तसेच रस्त्याच्या कडेला पडलेला असतो, त्यामुळे योग्य पध्दतीने घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

पाण्याच्या प्रवाहास अडथळा ठरणा-या सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी त्या ठिकाणची पाहणी करुन कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरणार नाही यासाठी त्या भागाची पाहणी करुन तात्काळ उपाययोजना करावी, आदी सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या आहेत.

भाजप चे वाहतूक विभागाचे दीपक मोढवे पाटील, यांनी देखील शहरातील मोठ्या प्रमाणावर रस्ते,नाले, ड्रेनेज ची दुरवस्था झाली आहे याविषयी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले होते. या विषयावर आयुक्तांनी तातडीने आदेश दिल्याबद्दल दिपक मोढवे पाटील यांनी महापालिकेचे आभार मानले आहे.
विभागांतर्गत समन्वय ठेवून शहरातील मुख्य नाले, ओढे, बंदीस्त नाले,उपनाले, सी.डी. वर्क्स, पाईप कलव्हर्टस, गटारे यांची साफसफाईची कामे पूर्ण करावीत. शहरातील साठलेला कचरा त्वरीत उचलावा. सर्व झोपडपट्यांमधील गटारे, नाले स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त राहतील याची दक्षता घ्यावी.

प्रत्येक पावसानंतर याठिकाणाची पाहणी करुन त्याची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी.
पावसाळ्याच्या काळात जलनि:सारण वाहिन्या चोकअप काढणे यासाठी स्वतंत्र पथक काम करणार आहे.
स्टॉर्म वॉटर चेंबर्स, जलनि:सारण, सर्व मॅनहोल्स यावर योग्य क्षमतेचे झाकण असल्याची खातरजमा करावी.

शहरातील जी ठिकाणे जलमय होतात त्या ठिकाणांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.

Related posts

कुंदा भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर शाळेला सॅनिटायजर मशीन भेट

PC News

आरोग्य हितासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला कोरोना सेफ्टी किटचे सहयोग

PC News

प्रभाग१७ मध्ये रेंगाळलेली विकास कामे सुरू, नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार

PC News

छ. उदयनराजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेणार

PC News

चुकीच्या माहिती मुळे इंदिरानगर दळवीनगरच्या नागरिकांमध्ये घबराट

PC News

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मिनरल वॉटर नव्हे !

PC News

एक टिप्पणी द्या