July 26, 2021
पिंपरी चिंचवड व्यापार

वाकड मध्ये या ठिकाणी होतोय फिनिक्स मॉल

वाकड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात विकसित गांवांमध्ये वाकडचाही समावेश आहे. हिंजवडी लगत असलेल्या वाकड परिसरास आयटी पार्क मध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची वाकड, ही राहण्यासाठी पहिली पसंती आहे.

तसेच वाकड परिसर बीआरटीने जोडलेलं आहे आणि सर्व दिशेने धावणारे बीआरटी बस वाकडहुन जातात. यापुढे वाकड पुलाजवळ मेट्रो स्टेशनचं देखील नियोजन आखण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी काम देखील सुरू आहे.

आता वाकड मध्ये 3 नवीन प्रोजेक्ट येणार असल्याची चर्चा रंगली आहे, यात वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC), इऑन आयटी पार्क (EON IT Park) आणि फिनिक्स मॉल (Phoenix Mall) याचा समाविष्ट असल्याचं सांगण्यात येत आहे.

अद्यापही वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि इऑन आयटी पार्क विषयी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही, मात्र फिनिक्स मॉलचे काम जोमाने सुरू आहे. 12 एकर मध्ये सयाजी हॉटेलच्या मागच्या बाजूला फिनिक्स मॉलसाठी कमर्शिअल बिल्डिंग बांधण्याचं काम सुरू आहे. फिनिक्स मॉल आल्यामुळे वाकड परिसराची  शोभा वाढणार आणि परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे, पिंपरी चिंचवडच्या तरुणांमध्ये एक आनंदाची लहर आहे.

Related posts

ऍमेझॉनच्या व्यवसायाला भारतात सर्वात जास्त फटका

PC News

पुण्यातील एएफएमसी चे ब्रिगेडियर अनंत नाईक यांची आत्महत्या

PC News

पुरावे देऊन ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब पिंपरीमधील आसवानी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई कधी करणार ?:सुरेश निकाळजे(अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी)

PC News

प्रभाग१७ मध्ये रेंगाळलेली विकास कामे सुरू, नागरिकांनी मानले नगरसेवकांचे आभार

PC News

कोरेगाव तालुका भाजप महिला अध्यक्ष पदी हेमलता पोरे यांची बिनविरोध निवड, खा.छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी केले अभिनंदन!!!

PC News

रायगड मधील खालापूर येथील ठाकूरवाडीला टीसीएफ ची मदत

PC News

एक टिप्पणी द्या