October 23, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केले खंडणीसाठी मेडीकल चालकाचे अपहरण,६आरोपींना वाकड पोलिसांनी केली अटक!!!

काळेवाडी:प्रतिनिधी
थेरंगाव परिसरात महाराष्ट्र पोलिस असल्याचे बनावट सांगून मेडिकल व्यवसाय करणाऱ्याचे अपहरण करून सहा लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली. खबर कळताच खंडणी मागणाऱ्या सहा जणांना वाकड पोलिसांनी अटक केली.अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. ही घटना डांगे चौक, थेरगाव येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अशोक बेलिराम आगरवाल (वय ५३, रा.किवळे) यांनी फिर्याद दिली. सिद्धार्थ भारत गायकवाड (वय ३२), प्रीतेश बबनराव लांडगे (वय ३०), राहुल छगन लोंढे (वय २४), प्रकाश मधुकर सजगणे (वय३१), कमलेश बाफना, संतोष ओव्हाळ व आकाश हारकरे (रा. सर्वजण वाकड) यांच्यावर अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार मंगळवारी दुपारी काही अनोळखी व्यक्ती आगरवाल यांच्या मेडिकलमध्ये विनापरवाना आत येऊन त्यांनी कपाटातील एमटीपी कीट व दोन फायली घेतल्या. तसेच, ‘आम्ही पोलिस असून, या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास खुनाचा गंभीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
त्यामुळे येरवडा जेलची हवा खावी लागेल,अशी भीती दाखवीत जबरदस्तीने आगरवाल यांना त्यांच्या मोटारीत बसविले.
सदर आरोपींनी अपहरण इसमाला दत्त मंदिर वाकड रस्त्यावर फिरवून आगरवाल व डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली व एक तासाच्या आत पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली.
या प्रकाराबाबत डॉ. खरे यांनी वाकड पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन लावून विचारपूस केली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘आमचे असे कोणीही पोलिस आले नाहीत. त्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक अशोक जगताप व विजय वेळापुरे यांना घटनास्थळी पाठविले. या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता डांगे चौक गाठले असता आरोपी त्यांना बघून पळू लागले. मात्र, त्यांनी पाठलाग करून पाच जणांना पकडत मोटारीत बसविलेल्या व्यावसायिकाची सुटका केली. दोन आरोपी फरारी झाले होते.

अटक केलेले आरोपी टायगर ग्रुप संघटनेचे सदस्य!!!

त्यापैकी एकाला रात्री अटक केली दरम्यान, या गुन्ह्यातील सिद्धार्थ गायकवाड व संतोष ओव्हाळ हे टायगर ग्रुप संघटनेचे पदाधिकारी आहेत.

त्यांनी याआधी असे प्रकार कुठे-कुठे केले?  याचा तपास वाकड पोलिस करीत आहेत. मात्र वाकड हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts

पुण्यातील एएफएमसी चे ब्रिगेडियर अनंत नाईक यांची आत्महत्या

PC News

कोरोनामुळे करिना चा मृत्यू ?

PC News

तालेरा हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्र केशवनगर शाळेत सुरू करा:मधुकर बच्चे

PC News

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

PC News

कोरेगाव तालुका भाजप महिला अध्यक्ष पदी हेमलता पोरे यांची बिनविरोध निवड, खा.छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी केले अभिनंदन!!!

PC News

पुण्यातील मंडई येथील शारदा गणेश मंदिरात लाखोंच्या दागिन्यांची चोरी

PC News

एक टिप्पणी द्या