December 8, 2021
आरोग्य जीवनशैली दुनिया भारत

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंह यांचा 91व्या वर्षी निधन

चंडीगढ : भारताचे महान ऍथलिट म्हणून ओळख असणारे तसेच अनेक अंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारतासाठी गौरव कमावणारे मिल्खा सिंह यांनी आज चंडीगढच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये आवाज अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन कोरोनामुळे झाल्याचे समजते.

मिल्खा सिंह यांची गेल्या महिन्यात कोरोना टेस्ट पोसिटीव्ह आल्यानंतर त्यांना चंदिगढच्या फॉरटीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी हलवण्यात आले. काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि त्वरित त्यांना हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी देखील कोरोना पोसिटीव्ह होत्या आणि उपचार दरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला.

आयसीयू मध्ये असल्याकारणाने मिल्खा सिंह आपल्या पत्नी निर्मल कौर यांच्या अंत्यविधीसाठी देखील उपस्थित राहू शकले नाही आणि पत्नीच्या मृत्यूच्या 5 दिवसांनी मिल्खा सिंहानी देखील जगाचा निरोप घेतला.

फ्लाईंग सिख या नावाने त्यांची ओळख होती.

Related posts

वाल्हेकरवाडी,शिवनगरी,गुरुद्वारा, बिजलीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!!!:ज्योती भालके(अध्यक्षा, जिजाऊ महिला मंच)

PC News

आता सगळेच घेणार इलेक्ट्रिक कार ! वाचा कारण

PC News

पिंपरी चिंचवड मध्ये होतीये कॅन्सरची विक्री

PC News

३१ मार्चला (PMAY) पंतप्रधान आवास योजना होणार बंद

PC News

नगरसदस्य विठ्ठल भोईर यांच्या कडून कोरोना योध्यांचा कृतज्ञता सत्कार

PC News

चिंचवड च्या राजाचा लोक कलावंतांना मदतीचा हात!!!

PC News

एक टिप्पणी द्या