September 20, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

वाकड पोलिसांनी थेरंगाव मधील१०जणांच्या सुमित माने टोळीवर केली मोक्का कारवाई, वाकड पोलीस जोमात!!!

चिंचवड:प्रतिनिधी
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न करून खंडणी उकळणे, दरोडा घालणे असे गंभीर गुन्हे करून वाकड,थेरंगाव, काळेवाडी परिसरात वर्चस्वासाठी टोळी निर्माण केलेल्या सराईत गुन्हेगार सुमित माने टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले

टोळी प्रमुख सुमित सिद्राम माने (वय २१, रा. काळेवाडी फाटा, वाकड, ) अभिषेक भाऊसाहेब रोडे (वय१८ रा. श्रमिक कॉलनी, दत्तनगर, थेरगांव)मारुती केरनाथ देढे (वय २० रा. गजानन मेडीकल समोर, कस्पटे वस्ती, वाकड,), सुरज हरीभाऊ तिकोणे (वय २५, रा.सोनाई कॉलनी, दत्तनगर, थेरगांव,)पवन भारत बलवंते (वय १९, रा. गणपती मंदिरा जवळ वाकड,)जीवन त्रिभुवन (रा. कैलासनगर, पिंपरी )भावेश (पूर्ण नाव पत्ता नाही) आणि तीन अल्पवयीन मुलांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वाकड पोलिसांनी अपर पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता.
त्यावर अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उप-आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा,संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, सुहास पाटोळे यांच्या पथकाने केली.

Related posts

लोणावळा, खडकवासला, ताम्हिणी येथे कडक बंदोबस्त, पर्यटकांवर होणार कारवाई

PC News

भोसरी मधील स्टेट बँकेचे एटीएम फोडणारे ३दरोडेखोरांना हरियाणा मधून अटक,भोसरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!!!

PC News

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा,उपक्रमाचे कौतुक,अनेक मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

PC News

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करा,सहाय्यक आयुक्त विकास ढाकणे यांना दिले निवेदन!!!: विनोद कांबळे(अध्यक्ष:सामाजिक न्याय विभाग,राष्ट्रवादी काँग्रेस))

PC News

चापेकर चौकात ७०हजारांची दारू जप्त, सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई!!!

PC News

उद्या सगळ्यांच्या नजरा वाईन शॉप कडे

PC News

एक टिप्पणी द्या