July 26, 2021
इतर

पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनतर्फे मावळ मधील पोलीस स्टेशनला छत्रीचे वाटप!!! :गजानन चिंचवडे(संस्थापक, अध्यक्ष)

चिंचवड:प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य )- मावळ विभाग च्या वतीने वडगांव व तळेगाव मावळ येथील पोलीस बांधवाना छत्री वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाने तसेच पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वडगांव मावळ चे अध्यक्ष मंगेश खैरे यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या पावसाळा ऋतू सुरु झाला आहे आपले कर्तव्य बजावत असताना ऊन, पाऊस यापासून आपल्या पोलीस बांधवाचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री वाटप करण्यात आले असे आपल्या प्रास्ताविक मध्ये वडगांव मावळ चे अध्यक्ष मंगेश खैरे यांनी मांडले
वडगांव व तळेगाव मावळ येथिल पोलीस स्टेशन च्या सर्व पदाधिकारी यांना एकूण ८४ लहान छत्र्या व तीन मोठ्या आकाराच्या छत्र्या देण्यात आल्या.वडगांव मावळ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निंबाळकर साहेब,पोलीस सब इन्स्पेक्टर चामे साहेब,मनोज कदम साहेब,वडोदे साहेब ,काळे साहेब, माने साहेब ,ननावरे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्करराव जाधव, पोलिस निरीक्षक शहाजी पवार साहेब यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उपस्थित सर्वांचे आभार पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी तसेच पुणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष प्रवीण मुऱ्हे यांनी मानले.

Related posts

पुणे,पिंपरी चिंचवड पश्चिम महाराष्ट्र सोशल फाऊंडेशन ची स्थापना, सभासद होण्याचे आवाहन:रणजित औटी,(अध्यक्ष)

PC News

भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांना कोरोनाची लागण

PC News

आकुर्डी मध्ये जनसेवा प्रतिष्ठान तर्फे १महिन्यापासून मोफत अन्नदान:मंदार कुलकर्णी, जनसेवा प्रतिष्ठान

PC News

पिंपरी : डॉक्टरांनी आस सोडली मात्र आत्मविश्वासाने कोरोनावर केली मात

PC News

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, सह्याद्री प्रतिष्ठान व अखिल मातंग समाज खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने 101 बॉटल चे खडकीमध्ये भव्य रक्त संकलन!

PC News

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात 5 पोलीस कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह सापडल्याने प्रेमलोक पार्क परिसरातिल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

PC News

एक टिप्पणी द्या