July 26, 2021
पिंपरी चिंचवड राजकारण

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करा,सहाय्यक आयुक्त विकास ढाकणे यांना दिले निवेदन!!!: विनोद कांबळे(अध्यक्ष:सामाजिक न्याय विभाग,राष्ट्रवादी काँग्रेस))

चिंचवड:प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त विकास ढाकणे यांना पिंपरी चिंचवड शहराच्या सुशोभीकरणात अडथळा निर्माण करणारे अनधिकृत नामफलक (होर्डिंग) काढण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत नामफलक (होर्डिंग) हटवण्यात यावे सध्या वारा व पाऊस यामुळे मोठं मोठे नामफलक (होर्डिंग) रस्त्याच्या दुतर्फा आणि शहाराच्या चौका- चौकाच्या परिसर भागात लावले आहेत.
भविष्यकाळात ही जिवीतहानी टाळायची असेल तर अनधिकृत नामफलक (होर्डिंग) हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद कांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत बोचकुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर
उपाध्यक्ष सुनील कुसाळकर
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर,उपाध्यक्ष पंकज कांबळे शहर उपाध्यक्ष आनंद सुपेकर यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Related posts

खाजगी शाळा ना फी साठी मनसे विध्यार्थी सेनेचा इशारा

PC News

आनंदनगर मधील नागरिकांना प्राधिकरणमध्ये क्वारंटाईन करणे चुकीचे का ? -आ. आण्णा बनसोडे

PC News

मेडीकल मालकासह ३तरुणांना रेमडेसीविर विकताना अटक,वाकड पोलीसांची धडक कारवाई

PC News

सेवा निवृत्त होणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सन्मान

PC News

कॅब चालक, स्कुल बस चालक,आणि रिक्षा चालकांच्या गाडीच्या बँक इएमआय वर राज्य सरकारने २०२२ पर्यंत स्थगिती द्यावी:दिपक मोढवे पाटील,भाजप वाहतूक आघाडी

PC News

शहरातील वाईन शॉप उघडल्यामुळे कोरोना वाढला असता का ?

PC News

एक टिप्पणी द्या