July 26, 2021
आरोग्य इतर जीवनशैली

वेबिनारच्या माध्यमातून शंतनु जोशी सरांनी दिली संकटांकडे बघण्याची नवी दृष्टी 

‘संपूर्ण प्रदेशाला, देशाला किंवा जगाला एकाच वर्गात बसवून संकटांच्या मार्फत शिक्षण दिले जाते. प्रत्येक कठीण परिस्थितीत आपण स्वतःलामी या परिस्थितीतून काय शिकू शकतो किंवा शकतेहा प्रश्न विचारला आणि त्यानुसार कृती केली तर संकटांचा परिणाम कमी होऊन परिस्थितीवर मात करता येते.’ असे sj सरांनी (Life Purpose Strategist) सांगितले. जून २०२१ रोजी फॉग लॅम्प मिशन सेशन्सने आयोजित केलेल्या ‘Dedication to Disasters’ या वेबिनार मध्ये त्यांनी मार्गदर्शन केले

संकटे माणसाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देतात. याविषयाबद्दल अधिक बोलताना sj सरांनी संकटे उद्भवण्याची विविध कारणे, संकटकाळात आपण काय शिकायचे ते कसे शोधायचे, संकटांना कसे सामोरे जायचे हे स्पष्ट केले

विषयाची मुद्देसूद मांडणी आणि सर्व उपस्थितांना विषयाच्या गाभ्यापर्यन्त नेण्याची हातोटी यामुळे sj सरांनी दिलेले ज्ञान उपस्थितांपर्यंत उत्तमरीत्या पोहोचले त्याची प्रचिती प्रश्नोत्तरांच्या सत्रात झाली. लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यन्त सर्वांनी प्रश्न विचारून sj सरांकडून शंकानिरसन करून घेतले. सद्यस्थितीला अनुसरून अतिशय महत्वाचा विषय ‘Dedication to Disasters’ या वेबिनार मध्ये हाताळला गेला. या वेबिनारच्या सांगतेला सरांनी ध्यानाचा एक अनोखा प्रकार शिकवला, ज्याद्वारे संपूर्ण विश्वाच्या  कल्याणासाठी प्रार्थना केली.

यापुढील वेबिनार हे Motherly Wisdom Sessions तर्फे ‘Clutter to Clarity’ या विषयावर आयोजित होणार आहे. हे वेबिनार निःशुल्क असून त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले

For more information, visit our YouTube channel: t.ly/CUR9

Related posts

दृष्टीहीन समाजात नवी हरित क्रांति घडवतील:पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

PC News

कोयते दाखवून चिंचवड मध्ये अडीच हजारांची लूट

PC News

नागरिकांनो पहाटे ४ वाजता लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका,आजूबाजूच्या रहिवाश्यांना त्रास देऊ नका !!!!!!

PC News

स्थानिक भाजप नेत्यांचा रडीचा डाव उघड,शहराचा विकास तर होणार १००%:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना २५ लाखाची मदत, महापौर माई ढोरे यांच्या हस्ते कुटुंबियांना धनादेश सुपूर्त!!!

PC News

‘रेमडेसिवीर’ खरेदी करा, अन्यथा महापालिकेस टाळे लावू – विशाल वाकडकर

PC News

एक टिप्पणी द्या