July 26, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

१२.५%प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना परतावा द्यावा,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नाना पटोले यांनी केली पत्राद्वारे विनंती!!!: सचिन साकोरे(युवा शक्ती प्रतिष्ठान)

चिंचवड:प्रतिनिधी
आकुर्डी, निगडी,वाल्हेकर वाडी युवा शक्ती प्रतिष्ठान कडून दि१८जून रोजी महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी १२/५% परतावा मिळण्याची विनंती करण्यात आली होती. याविषयी युवा शक्ती प्रतिष्ठान चे सचिन साकोरे यांनी पत्र देऊन मागणी केली होती.

याविषयी महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तातडीने दखल घेत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण १९७२ साला पासून निगडी,आकुर्डी, वाल्हेकरवाडी मधील बाधित शेतकऱ्यांना गेल्या २०वर्षा पासून मोबदला मिळाला नसल्याने राज्य सरकार वर नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी महाविकास आघाडी सरकारचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना १२.५%परतावा देण्याबाबत कार्यवाही करावी असे पत्र पाठवले आहे.

यामुळे प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याविषयीची माहिती युवा शक्ती प्रतिष्ठान चे सचिन साकोरे यांनी दिली आहे.

Related posts

राष्ट्रवादीने एनडीए सोबत यावं – रामदास आठवले

PC News

… तर तो असेल नितीन गडकरींचा राजकीय वारसदार

PC News

आनंदनगर मधील नागरिकांना प्राधिकरणमध्ये क्वारंटाईन करणे चुकीचे का ? -आ. आण्णा बनसोडे

PC News

सामाजिक सुरक्षा पथकाची नाशिक फाटा येथे हुक्का पार्लर वर धडक कारवाई!!!चिंचवडमध्ये पण कारवाई ची नागरिकांचीअपेक्षा

PC News

शहरातील मधुमेही रुग्णांना लसीकरण मध्ये प्राधान्य द्यावे:दिपक मोढवे पाटील

PC News

सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

PC News

एक टिप्पणी द्या