January 23, 2022
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी,विक्री पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाप्पू गायकवाड, काळूराम कवितके यांचे पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाला निवेदन,लवकरच मागण्या मान्य करण्याचे अतुल आदे यांनी दिले आश्वासन!!!

चिंचवड:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जोशी यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड आरटीओ चे वरिष्ठ अधिकारी अतुल आदे यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात काही मागण्या संघटनेने केलेल्या आहे.

फायनान्स कंपनी यांच्या एनओसी गाडी मालक,गाडी विकणारा यांना समक्ष ओळख पटवून देणे आवश्यक, व्यवसाय वाहतूक करणारी वाहने यांचे पासींग करताना संबंधित एनओसी साठी दुसऱ्या आरटीओ कार्यालयात स्वतः पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय संपर्क करेल,टॅक्सी परमिट गाड्यांचा वार्षिक उत्पन्न नसल्याने त्यांचा टॅक्स माफ करावा,फायनान्स कंपन्या ची एनओसी मिळाल्यावर ‘बी’ फॉर्म ची सक्ती रद्द करावी जेणेकरून वाहने खरेदी करणारा ग्राहक आणि वाहन विक्रेता यांना अडीअडचणीचा सामना करावा लागणार नाही,अनेक वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचे पेपर,स्मार्ट कार्ड असलेले आर सी बुक मिळण्यासाठी मोठा विलंब होत आहे आणि गहाळ देखील होत आहे  त्यामुळे ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक होणे गरजेचे आहे.

त्यामुळे गाडीचे महत्वाचे पेपर गाडी मालकाला स्वहस्ते प्रधान करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.आणि मागण्या मान्य करावयाच्या साठी विनंती केली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाप्पू गायकवाड, उपाध्यक्ष काळूराम कवितके, सचिव गुलाब जाधव,संघटनेचे खजिनदार तानाजी बोराटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

तिसऱ्या लाटेला प्रभावीपणे थोपवण्यासाठी यंत्रणा उभी करावे – शिवसेनेच्या मंदा फड यांची मागणी

PC News

ही कार एकदा चार्ज केल्यावर चालते 800 किलोमीटर

PC News

स्टार्टअपच्या माध्यमातून महिला उद्योजकांमध्ये भर पडतेय – महापौर उषा ऊर्फ माई ढोरे

PC News

गुटखा बंदी फक्त नावापुरतेच का ?

PC News

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटकडे पोलिसांचे दुर्लक्ष

PC News

भोसरीतील एस टी महामंडळाचा ट्रायल ट्रॅक लवकरच सुरू, रमाकांत गायकवाड यांची माहिती,भाजपचे दिपक मोढवे पाटील यांच्या मागणीला यश!!!

PC News

एक टिप्पणी द्या