January 23, 2022
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

चिंचवड:प्रतिनिधी
शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन ने नागरिकांना मदतीचे आवाहन करीत दरवर्षी ज्यांच्याकडून गणपती घेतो त्या मूर्तिकार सोमनाथ खेडकर यांचा हा मुलगा आहे.
चला थोडा हातभार लावूया, माणुसकीचा धर्म जागवूया
एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा
चि.वेद सोमनाथ खेडकर( वय ६)
हसतं खेळतं मूल घरी झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात गंभीररित्या जखमी झाला आहे.

वेद हा भाजल्यामुळे जखमी होऊन त्याची प्रकृती नाजूक आहे, भोसरी येथील हॉस्पिटलला भरती केल्यांनतर पुढील उपचारासाठी सूर्या हॉस्पिटल येथे ऍडमिट केले आहे.
आता त्याला गरज आहे आपल्या मदतीची त्याला गरज आहे आपल्या आशीर्वाद आणि माणुसकीच्या भावनेतून सहकार्याची गरज आहे.

चि.वेदचे आई वडील मूर्तिकार असल्याने त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असून सूर्या हॉस्पिटलने सांगितलेला अंदाजे ६-७ लाखांचा खर्च त्यांना पेलणार नसून आपण लोकसहभागातून आपण आपापल्या परीने त्यांना मदत केली पाहिजे असे शेखर चिंचवडे यांनी सांगितले.

आतापर्यंतचा खर्च लोकवर्गणीतूनच केला असून पुढील खर्चासाठी आपल्याला प्रत्यक्ष सहभाग घेऊन चि. वेदचा जीव वाचविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे या साठी संपर्क करण्याबाबत
मदतीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क :- श्री. किरण देशमुख (वेदचे मामा)
गुगल पे/ फोन पे :- ८३०८३६१९०८
बँक नाव :- जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे
अकाउंट नंबर :- २२०१/२६००२
IFSC कोड :- JSBP00000037
शाखा :- सिंहगड रोड, पुणे   या ठिकाणी करण्यात यावी.

आपल्या मदतीची गरज असल्याचे दिसून येते आहे म्हणून आपली छोटीसी मदत देऊन माणुसकीचा धर्म जागवूया
असे शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन ने दानशूर नागरिकांना केले आहे.

Related posts

भाजप महिला मोर्चा तर्फे जागतिक योग शिबीर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न :उज्वला गावडे,(अध्यक्षा,भाजप महिला मोर्चा)

PC News

कावळे दत्तवाडी गावात केली सॅनिटायझर औषध फवारणी, महाड तालुक्यात होते कौतुक!!!

PC News

मी सुरक्षित राहणार , इतरांना ही सुरक्षित ठेवणार – शिवसेनेच्या मंदा फड यांचा नारा

PC News

स्पर्श हॉस्पिटलच्या कारवाईमुळे व्हाईट कॉलर राजकारणी,डॉक्टर पोलिसांच्या रडारवर!!!

PC News

सुरू झाले कात्रज पुणे मुंबई बाह्य वळण स्वच्छता अभियान,सामाजिक कार्यकर्ते भास्कर गोखले

PC News

लवकरच संपूर्ण लॉकडाऊन होणार ?

PC News

एक टिप्पणी द्या