September 20, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड राजकारण

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा कडून सन्मान आणि स्वर्गीय श्याम मुखर्जी दिनानिमित्त वृक्षारोपण !!! :उज्वला गावडे(अध्यक्षा भाजप महिला मोर्चा)

चिंचवड:प्रतिनिधी
राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप व शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त कोरानो काळात, एखाद्या योध्दा प्रमाणे जीवाची पर्वा न करता समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कर्तव्य दक्ष डॉक्टरांचा भाजपा पिंपरी चिंचवड महिला मोर्चाच्या वतीने सत्कार व सन्मान भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे व महिला मोर्च्या च्या पदाधिकारी यांच्याकडून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

त्याचप्रमाणे स्वर्गीय श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम चिंचवड येथील स्वर्गीय मुरलीधर गावडे (ऑक्सीजन पार्क)लक्ष्मीनगर येथे घेण्यात आला, यावेळी महाराष्ट्रचे राज्य फुलाचे वृक्ष, “ताम्हण” (जारुळ) या देशी झाडाचे रोपण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमा खापरे महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गणेश गावडे ,’ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, विठ्ठल भोईर, भाजपा चिटणीस संजयजी भंडारी, महिला मोर्चा उपाध्यक्ष रंजना चिंचवडे, पतंजली संस्कृती संवर्धनचे डॉ.अजितजी जगताप, भारतमाता सत्संगचे प्रशांतजी हरहरे,सुभाष वळसे, किरण कंद्रे ,कुलकर्णी काका,राजगौंद्दा चौगुले व नागरिक उपस्थितीत होते.

Related posts

चुकीच्या माहिती मुळे इंदिरानगर दळवीनगरच्या नागरिकांमध्ये घबराट

PC News

महाविकास आघाडी सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले – पिंपरी-चिंचवड भाजपकडून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध

PC News

एकाच वेळी 87 ठिकाणी रेड करणारे ‘ते’ अधिकारी कोण ?

PC News

12 ऑक्टोबर पासून धावणार पुणे – लोणावळा लोकल

PC News

YCM रुग्णालयास आमदार अण्णा बनसोडे यांची भेट – परिचारिकांचे केले अभिनंदन

PC News

‘रेमडेसिवीर’ खरेदी करा, अन्यथा महापालिकेस टाळे लावू – विशाल वाकडकर

PC News

एक टिप्पणी द्या