July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन च्या वतीने डॉक्टरांचा सन्मान, आणि वृक्षारोपण!!!

चिंचवड:मनोज शिंदे
१ जुलै जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून माजी ब प्रभाग अध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका करुणा चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फौंडेशन यांच्या वतीने ३११ देशी झाडांचा वृक्षरोपण सप्ताह या संकल्पनेअंतर्गत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि यांच्या पुढाकाराने डॉक्टर्स डे च्या दिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १७ मधील सेवाव्रती डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रत्यक्ष सन्माननीय डॉक्टरच्या हस्ते देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सर्व डॉक्टर बंधू भगिनींना आगळी वेगळी भेट शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांचेकडून देण्यात आली. सर्व डॉक्टर्सना अंध बांधवानी तयार केलेले सीड बॉल्स वृक्षसंवर्धनसाठी भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रो. शेखर बबनराव चिंचवडे, रोटरी चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, रो. सोमनाथ हारपुडे विद्यमान प्रेसिडेंट रो. सचिन खोले, विद्यमान सेक्रेटरी वनिता सावंत, माजी प्रेसिडेंट रो. सचिन काळभोर यांच्यासमवेत रो. सुभाष वाल्हेकर, रो. गणेश बोरा, रो. रुपेश मुनोत,रो. वसंत ढवळे, तसेच कोल्हे काका, सावंत साहेब, नाना दिवाने, विशाल वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी च्या अध्यक्षपदी सचिन काळभोर, तर सचिन खोले यांची सेक्रेटरी पदी निवड

PC News

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मिनरल वॉटर नव्हे !

PC News

शहरात प्रथमच सेंद्रिय शेतमाल, पालेभाज्या थेट दारात उपलब्ध – पिंपरी चिंचवड महिला बचत गटाचा उपक्रम

PC News

कोयते दाखवून चिंचवड मध्ये अडीच हजारांची लूट

PC News

धनंजय मुंढे यांची आमदारकी धोक्यात ?

PC News

कोरोनाच्या नावाखाली खरेदीत वस्तूंमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची कधी करणार आयुक्त चौकशी? मा.आमदार विलास लांडे यांची मागणी

PC News

एक टिप्पणी द्या