July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

नागरिकांनो पहाटे ४ वाजता लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका,आजूबाजूच्या रहिवाश्यांना त्रास देऊ नका !!!!!!

चिंचवड:मनोज शिंदे
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व प्रभागातील महापालिकेच्या रुग्णालयात कोव्हिडं१९चे १८ते४४ आणि४५च्या वयोगटातील व वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण मोफत सुरू आहे.
यासाठी ऑनलाईन बुकिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र ऑनलाईन बुकींग मिळत नसल्याने शहरातील नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करताना पहावयास मिळत आहे.

विशेष म्हणजे काही उद्धट नागरिक मध्यरात्री लसीकरण केंद्रावर नंबर लावण्यासाठी गर्दी करत आहे.लसीकरण साठीचे टोकणाचे सकाळी ९वाजता वाटप केले जाते.४ते५ तास गर्दीत थांबून वाट पाहत उभे राहत असल्याचे दिसते. एका लसीकरण केंद्रात जसा साठा उपलब्ध असेल तसे डोस दिले जातात. त्यामध्ये ऑनलाईन करणारे आणि उपस्थित असलेल्या नागरिकांचा समावेश करण्यात येत आहे. मात्र नागरिक नियमांचे पालन न करता कोरोनाच्या प्रसाराला जास्त प्राधान्य दिले जात असल्याचे गर्दीच्या ठिकाणी दिसून येत आहे.

ज्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने रहिवासी क्षेत्रात लसीकरण सुरू ठेवले असल्याने त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी ४वाजता गर्दी होण्यासाठी सुरवात होते मात्र प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाने याविषयी नागरिकांना आवाहन सुध्दा केलेले नाही हे विशेष म्हणावे लागेल.

त्यामुळे लसीकरण केंद्र प्रमुख आणि आजूबाजूच्या रहिवाश्यांच्या बरोबरच काही बेशिस्त नागरिक हुज्जत घालत असल्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे.
अनेक केंद्रावर अपूर्ण लसीकरण चा साठा उपलब्ध असल्याने नागरिक आजूबाजूला सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करत आहे.

काही ठिकाणी ऑनलाईन बुकींग वाले हजर नसले की तेथील कर्मचारी आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना बोलवून लस उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी उपस्थित केल्या आहेत.
याविषयी लसीकरण केंद्र प्रमुखांनी तातडीने तक्रारींचे निरासरण करून उपस्थित असलेल्या नागरिकांना लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी आणि नागरिकांमधील वादाचे प्रसंग कमी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने देखील जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण नियोजन बद्ध करण्यासाठी अजून उपाय योजना आखणे गरजेचे बनले आहे त्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने जसे घरोघरी लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेने घरोघरी जाऊन १८ते४४आणि४५पुढे असणाऱ्या नागरिकांना लसीकरण सुरू करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

Related posts

राज्यात 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यास मुख्यमंत्री आग्रही मात्र तज्ज्ञांच्या मते 14 दिवस गरजेचे

PC News

लोणावळा, खडकवासला, ताम्हिणी येथे कडक बंदोबस्त, पर्यटकांवर होणार कारवाई

PC News

सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

PC News

राहण्यासाठी रावेत पेक्षा वाकड बरे – नागरिकांची प्रतिक्रिया

PC News

भोसरी मधील स्टेट बँकेचे एटीएम फोडणारे ३दरोडेखोरांना हरियाणा मधून अटक,भोसरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!!!

PC News

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

PC News

एक टिप्पणी द्या