July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड राजकारण

वाल्हेकरवाडी,शिवनगरी,चिंचवडेनगर,गुरुद्वारा परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन!!!:ज्योती भालके(अध्यक्ष,जिजाऊ महिला मंच)

चिंचवड:मनोज शिंदे
चिंचवड मध्ये वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर,शिवनगरी, गुरुद्वारानगर परिसरातील महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे ५जुलै२०२१ते१०जुलै२०२१या दरम्यान मावळचे लोकप्रिय खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे आणि जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शिवसेना महिला आघाडी आणि जिजाऊ महिला मंचाच्या अध्यक्षा ज्योती संदीप भालके यांनी आयोजित केले आहे.

या मोफत शिबिरामध्ये सहभागी होण्याऱ्या महिलांनी भालके कॉलनी मध्ये ज्योती संदीप भालके यांच्या कार्यालयात ९९२१५१७२३६/७३५००१२६५४ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

       “लवकर निदान म्हणजेच जीवनदान”
या संकल्पनेतून हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे यावेळी घेयची याबद्दल मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.आजार तसा भयंकर धोकादायक आहे यासाठी महिलांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे जिजाऊ महिला मंच अध्यक्षा ज्योती भालके यांनी सांगितले.

यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी तपासणी केली जाणार आहे.
जिजाऊ महिला मंचाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम, गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आदी उपक्रम राबविले जातात.

राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर नागरिक देखील सहभागी होत असतात.नागरिकांच्या समस्या,आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्परतेने जिजाऊ महिला मंच अग्रेसर असतो.

Related posts

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा कडून सन्मान आणि स्वर्गीय श्याम मुखर्जी दिनानिमित्त वृक्षारोपण !!! :उज्वला गावडे(अध्यक्षा भाजप महिला मोर्चा)

PC News

राष्ट्रवादी काँग्रेस देहू शहर च्या वतीने महावितरण च्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

PC News

अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा लोकार्पण

PC News

आमदार अण्णा बनसोडेंच्या पाठपुराव्याला यश, पिंपरी चिंचवड मनापा कर्मचार्यांना ७ वा वेतन लागू – आयुक्तांची मान्यता

PC News

खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फेस शिल्ड चे वाटप

PC News

पुण्यातील गोल्डमॅन सचिन शिंदे यांची गोळ्या झाडून हत्या

PC News

एक टिप्पणी द्या