July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड राजकारण

वाल्हेकरवाडी,शिवनगरी,गुरुद्वारा, बिजलीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!!!:ज्योती भालके(अध्यक्षा, जिजाऊ महिला मंच)

चिंचवड:मनोज शिंदे
चिंचवड मध्ये वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर,शिवनगरी, गुरुद्वारानगर परिसरातील महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन ५जुलै२०२१ ते१०जुलै२०२१या दरम्यान मावळचे लोकप्रिय खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे आणि जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शिवसेना महिला आघाडी आणि जिजाऊ महिला मंचाच्या अध्यक्षा ज्योती संदीप भालके यांनी केले आहे.
या मोफत शिबिरामध्ये सहभागी होण्याऱ्या महिलांनी भालके कॉलनी मधील ज्योती संदीप भालके यांच्या कार्यालयात ९९२१५१७२३६/७३५००१२६५४ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“लवकर निदान म्हणजेच जीवनदान”
या संकल्पनेतून हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे यावेळी घेयची याबद्दल मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.आजार तसा भयंकर धोकादायक आहे यासाठी महिलांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे जिजाऊ महिला मंच अध्यक्षा ज्योती भालके यांनी सांगितले.

यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी तपासणी केली जाणार आहे.
जिजाऊ महिला मंचाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम, गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप इत्यादी उपक्रम राबविले जातात.
राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिक देखील सहभागी होत असतात.नागरिकांच्या समस्या, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्परतेने जिजाऊ महिला मंच अग्रेसर असते अशी चर्चा वाल्हेकरवाडी,चिंचवडेनगर,शिवनगरी परिसरात सूरु आहे.

Related posts

अक्षय चव्हाण सोशल फाऊंडेशन तर्फे मिठाई वाटपाचा उपक्रम

PC News

YCM रुग्णालयास आमदार अण्णा बनसोडे यांची भेट – परिचारिकांचे केले अभिनंदन

PC News

सोशल डिस्टन्सिंग पाळून सांगवीत विवाह सोहळा संपन्न

PC News

युनिव्हर्सिटी चौकातील पूल होणार जमीनदोस्त?

PC News

वाकड विभागाचे ACP गणेश बिरादार यांना सेवेतून बडतर्फ करा – अपना वतन संघटनेचे गृहमंत्र्याना पत्र

PC News

वयाने 27 वर्ष लहान असलेल्या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न करणारे ‘ते’ मुख्यमंत्री कोण आहेत ?, पहा फोटो…

PC News

एक टिप्पणी द्या