September 20, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ मधील शासकीय कार्यालयात बोगस आरटीआय कार्यकर्त्यांचा सुळसुळाट,बोगसगिरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय,पोलीसांना कारवाईची मागणी!!!

चिंचवड:मनोज शिंदे
पिंपरी चिंचवड शहर,मावळ, परीसरामध्ये बोगस आरटीआय कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असल्याने माहिती अधिकाराचा गैरवापर करून आणि त्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला, कर्तव्ये दक्ष अधिकाऱ्यांना टार्गेट करून नाहक मनस्ताप दिला जात असल्याची चर्चा शहरात नागरिकांमध्ये सुरू आहे.

Click Image for details 👆

तरी अशा बोगस तथा कथित आरटीआय कायद्याच्या नावाची बदनामी करणाऱ्यांची पोलिसांनी माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मावळ,पिंपरी चिंचवड शासकीय कार्यालये,महसूल कार्यालयात बोगसगिरी करणारे टोळके हेरगिरी करत आपले सावज शोधून त्यांना टार्गेट करून आर्थिक सेटलमेंटची मागणी केली जाते असे वारंवार दिसून येते


त्यामुळे निष्ठावान आरटीआय कार्यकर्ते या कायद्यापासून दूर राहणे पसंत करतात परिणामी याचा फायदा हे भामटे कार्यकर्ते घेतात असे निदर्शनास येते.
काही दिवसांपूर्वी देहूरोड परिसरात असेच एक टोळके नाहक सर्वसामान्य नागरिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचे दिसून आले होते याविषयी अनेक वर्तमान पत्रात या विषयावर बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

या टोळीच्या म्होरक्या बनावट सीआयडी अधिकारी बनून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच असलेले रामदास करंदीकर यांच्या घरावर २२एप्रिलमध्ये २०१८ मध्ये स्थानिक पोलिसांना हाताशी धरून दरोडा टाकला होता.
यावेळी ३ कोटींची माहिती त्यांना लागली      होती मात्र प्रत्यक्षात ५लाख रुपयांची रोकड लुटून नेण्यात आली होती.
विशेष म्हणजे या बोगसगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला पुणे पोलीसांचा बॉडिगार्ड देखील होता.

त्याला देखील या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सिंधुदुर्ग पोलिसांनी निलंबित केले.
याप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर टोळीच्या म्होरक्याला मुंबईत टोल नाक्यावर काम करताना अटक करण्यात आली. त्यामुळे पुन्हा ही बोगसगिरी करणारी टोळी मावळ, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात सक्रिय तर झाली नाही ना हे  शोधून काढणे गरजेचे असल्याचे दिसून येते.

शासकीय अधिकाऱ्यांनी देखील माहिती कायद्या अंतर्गत विचारलेली माहिती तक्रारदाराला चिरीमिरी न घेता उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना शासकीय व्यवस्थेवर विश्वास बसण्यासाठी मदत होईल असे काम घडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Related posts

पिंपळे सौदागर मध्ये अंतर्जातिय प्रेमप्रकरण असल्यामुळे तरुणाचा खून

PC News

देवेंद्रजींच्या सरप्राईज भेटीमुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित

PC News

दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे आंदोलन!!!:विनोद कांबळे(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सामजिक न्याय विभाग)

PC News

उन्नति सोशल फाउंडेशन तर्फे कार्यालय ते लसीकरण केंद्र जाणे व येण्याचे मोफत सुविधा

PC News

कोविड १९ लोकडाऊन २ आठवडे वाढले

PC News

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी ?

PC News

एक टिप्पणी द्या