July 26, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

पश्चिम महाराष्ट्र सोशल फाऊंडेशनसाठी अहोरात्र मदतीचे दिले आश्वासन,सभासद नोंदणी जोरात सुरू !!! : राहुल कलाटे (मा.गटनेते शिवसेना,नगरसेवक)

चिंचवड: मनोज शिंदेपश्चिम महाराष्ट्र सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड पुणे येथे स्थायिक असलेल्या मूळ सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील रहिवाशांना एकत्रित करून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व वैयक्तिक अडी-अडचणी सोडविण्याच्या उद्दिष्टाने पश्चिम महाराष्ट्र रहिवासी सोशल फाउंडेशन ची पिंपरी चिंचवड येथे नुकतीच स्थापना करून सोशल फाउंडेशनची अध्यक्ष रित्या रजिस्टर नोंदणी करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून वधू वर सूचक केंद्र, रक्तदान शिबिर, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रंथालय, व तरुण वर्गासाठी नोकरी विषयक व व्यवसाय विषयक मार्गदर्शन केंद्र सुरू करणे. महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना व्यवसाय पूरक मार्गदर्शन व व्यवसायाचे निर्मिती करणे, रुग्णवाहिका व वैयक्तिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्याची ध्येये व उद्दीष्टे आहेत.

चिंचवडेनगर येथे पश्चिम महाराष्ट्र रहिवासी सोशल फाउंडेशनच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ राष्ट्रवादी युवक कांग्रेस महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रविकांत वर्पे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका लोकप्रिय नगरसेवक राहुल कलाटे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस लाला चिंचवडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद कांबळे, संदीप थोरात, निलेश शिंदे, यांच्या शुभहस्ते नोंदणी करण्यात आली.
वरील मान्यवरांची सोशल फाउंडेशनच्या सल्लागारपदी एक मुखी बिनविरोध निवड करण्यात आली.
रविकांत वर्पे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस महाराष्ट्र राज्य) म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र सोशल फाउंडेशन पक्ष विरहित समाज कार्य करणारी संघटना असावी संघटनेमध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून रहिवाशांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवावा. सोशल फाऊंडेशनला सर्वतोपरी मदत केली जाईल असा शब्द दिला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षम नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले की, बऱ्याच दिवसापासून पदाधिकाऱ्यांचा स्वप्न होतं स्वतंत्र पश्चिम महाराष्ट्र वासी सोशल फाउंडेशन स्थापना करण्याचे ते स्वप्न आज सत्यात उतरले. सोशल फाउंडेशन ला सहकार्य करण्याचा शब्द दिला व शुभेच्छा व्यक्त केल्या.
सोशल फाउंडेशन च्या सभासद नोंदणी पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

प्रदीप पांडे, संदीप शिंदे, समाधान गिरी, राजू थोरात, काशिनाथ तेलंगे, ऋतुराज पाटील, राजू काळे, अशोक मुंडे, रितेश कुंभार, महादेव गुरव, नितीन पाटील, यशवंत उबाळे पंकज चोपदार सागर सुतार जितेंद्र ननावरे राजू मोहिते अनिल कुमार कदम इत्यादी सभासदांची नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र रहिवासी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रणजीत औटे (पश्चिम महाराज सोशल फाउंडेशन) चे उपाध्यक्ष अमोल पाटील, पश्चिम महाराष्ट्र सोशल फाउंडेशन चे कार्याध्यक्ष राजेंद्र थोरात, पश्चिम महाराष्ट्र फाऊंडेशनचे सचिव समाधान गिरी, पश्चिम महाराष्ट्र फाऊंडेशनचे खजिनदार अतुल वर्पे, व पश्चिम महाराज सोशल फाउंडेशन कार्यकारणी सदस्य संदीप शिंदे, प्रदीप पांडे, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते.


कोरोना च्या काळात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन, कार्यक्रम घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र रहिवासी सोशल फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

Related posts

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, आरोपीस अटक

PC News

पिंपरी चिंचवडचे आयुक्त बनले सर्व पक्षाचे कृत्रिम हार्डवैरी,विरोध केला नाही की विकास कामे सुरू!!!

PC News

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी,विक्री पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाप्पू गायकवाड, काळूराम कवितके यांचे पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाला निवेदन,लवकरच मागण्या मान्य करण्याचे अतुल आदे यांनी दिले आश्वासन!!!

PC News

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुणे दौरा

PC News

सुभाष पांढरकर नगरमध्ये दूषित पाणी पुरवठा,नागरिकांचे आरोग्य धोक्यात!!!:निखिल दळवी(राष्ट्रवादी काँग्रेस, उपाध्यक्ष)

PC News

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मिनरल वॉटर नव्हे !

PC News

एक टिप्पणी द्या