July 25, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या ठेकेदार संजीव चिटणीस यांच्यावर गुन्हा दाखल, अभियंता प्रविण लडकत यांनी दिली फिर्याद!!!

चिंचवड:मनोज शिंदे
पिंपरी चिंचवड़ महापालिकेत पाणी पुरवठा विभागाची निवीदा मिळविण्याकरीता बनावट अनुभवाचा दाखला दिल्याप्रकरणी एका ठेकेदारांवर पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण विठ्ठल लडकत (महापालिका अभियंता) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस फिर्याद दिली आहे.
मे . संजीव प्रिसीजनचे प्रो. संजीव यशवंत चिटणीस (वय-६५ वर्षे , महेश सोसा बिबवेवाडी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजीव चिटणीस याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची निवीदा मिळविण्याकरीता पुणे महानगरपालिकेकडील पाणी पुरवठा विभागाकडील पर्वती जल शुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन गॅस सिलेंडर साठीवणुकी साठी शेड बांधणे , दहा किलो तास क्षमतेचे क्लोरीनेटर्स पुरविणे , क्लोरीन न्युट्रलायझेशन यंत्रणा बसविणे व अशा प्रकारची कामे केल्या असल्याचा कार्यकारी अभियंता असलेला विद्युत विभाग कार्यालयाकडील बनावट अनुभवाचा दाखला तयार करुन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेस सादर केला व महानगरपालिकेची कागदोपत्री फसवणूक केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

ISIS च्या संपर्कात असलेल्या 2 व्यक्तींना पुण्यातून अटक करण्यात आले आहे

PC News

क्वारन्टाईन मध्ये महापालिकेचे डॉक्टर,स्टाफ ठरतायेत देवदूत!

PC News

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

PC News

प्रभाग क्रमांक १७ मध्ये “डॉक्टर आपल्या दारी माझा परिसर माझी जबाबदारी”

PC News

भोसरी येथे १२ सराईत गुन्हेगारांना अटक

PC News

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा,उपक्रमाचे कौतुक,अनेक मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

PC News

एक टिप्पणी द्या