July 26, 2021
जीवनशैली पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

महाराष्ट्र सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशनचे अध्यक्ष विजय पोरे यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्य पदी निवड करण्याची खटाव कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली मागणी!!!

सातारा:मनोज शिंदे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्य पदी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष विजय कुमार पोरे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी खटाव तालुक्यातील कोरेगाव खटाव चे विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनात केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने आमदार महेश शिंदे म्हणाले की, सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन ही पूजाअर्चा ,धार्मिक विधी, मंदिर देखभाल करणारी पश्चिम महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष विजय पोरे असून गुरव समाजाला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. या समाजाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती वर सदस्य पदी नियुक्ती करणे हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे.

यामुळे सातारा जिल्ह्याला मोठा सन्मान प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे.तरी आपण सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन चे अध्यक्ष विजय पोरे यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्यपदी निवड करावी आणि    सातारा जिल्ह्याला संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खटाव तालुक्यातील कोरेगाव खटाव चे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

Related posts

कॅब चालक, स्कुल बस चालक,आणि रिक्षा चालकांच्या गाडीच्या बँक इएमआय वर राज्य सरकारने २०२२ पर्यंत स्थगिती द्यावी:दिपक मोढवे पाटील,भाजप वाहतूक आघाडी

PC News

माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या जन्मदिनी कार्यकर्त्यांना केली आपुलकीची विनंती

PC News

वाय सी एम रुग्णालयात १०रुग्णवाहिका दाखल

PC News

पुनावळे येथील घनकचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

पिंपरी चिंचवड मधील त्रिमूर्तींचे त्रिगुणात्मक योगदान

PC News

सेकटर 22 मध्ये माजी नगरसेवकांनी घेतला कोरोनाचा धसका

PC News

एक टिप्पणी द्या