July 25, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

… तर हिंजवडीतून या मोठ्या कंपन्या बाहेर पडणार ?

पुणे : हिंजवडी हे पुणे शहराचा ‘आयटी हब’ म्हणून ओळखला जाणारा आणि मोठं क्षेत्रफळ असलेलं स्थान आहे.

हिंजवडी मध्ये टीसीएस (TCS), इन्फोसिस (infosys), विप्रो (work) कॉग्निझंट,(cognizant) टेक महिंद्रा (tech mahindra) यासारख्या आणखी काही कंपन्या कार्यरत आहेत. तसेच हजारो कर्मचारी याठिकाणी काम करतात.

Click to View Details 👇

सध्या कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) ची परिस्थिती असल्यामुळे बहुतांश कर्मचारी घरातूनच काम करत आहेत परंतु लवकरच सगळं सुरळीत झाल्यास पुन्हा सगळे काम करण्यासाठी ऑफिसला येऊ लागतील आणि यासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे ट्रॅफिकचा होतो. येता जाता हिंजवडी परिसरात पूर्णपणे ट्रॅफिक जॅम (traffic jam) लागतो आणि यामुळे कर्मचारी वेळेवर कमला पोहचत नाहीत तसेच घरी जातानाही त्यांना तितकाच त्रास सहन करावा लागतो.

यासाठी हिंजवडी ग्रामपंचायत सर्व प्रयत्न करत आहे आणि पुणे महामेट्रोचे काम देखील सुरू आहे.

मात्र मेट्रोचे काम 2022 पर्यंत व्हावे यासाठी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने (HIA) सरकारकडे मागणी केली होती परंतु कोरोनामुळे कामाची गती थंडावली आणि काम संथ गतीने सुरू राहिल्याचे दिसून आले.

मेट्रो आल्याने कर्मचाऱ्यांची फार सोय होईल तसेच हिंजवडी येथील रहिवाशांना पुणे शहराशी सहजपणे जुडता येईल. हिंजवडी फेस 3 ते शिवाजीनगर केवळ काही मिनटात हे अंतर गाठता येईल.

पुन्हा सगळे सुरळीत होण्या अगोदर लवकरच जर मेट्रोचे  काम झाले नाही तर कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्यास हिंजवडीतून अनेक कंपन्या बाहेर पडतील ही शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.

Related posts

आळंदी : दगडाने ठेचून एकाचा खून

PC News

पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये मोफत शिवभोजन थाळी कुठे मिळणार ?

PC News

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन च्या वतीने डॉक्टरांचा सन्मान, आणि वृक्षारोपण!!!

PC News

उन्नतीचे  २०२१ चे स्वागत २०२१ झाडांचे मोफत वाटप करून,ग्रीन पिंपळे सौदागर करण्याचा संकल्प

PC News

सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट वतीने मंदिरातील पुजारी,कर्मचारी,आणि विश्वस्त यांना लसीकरणसाठी प्राधान्य देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी !!!: विजय कुमार पोरे(अध्यक्ष:सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य)

PC News

श्रेय वादाच्या लढाईत राष्ट्रवादीच्या समोर भाजपची माघार का? महापालिकेत आयुकांना घेराव,पंतप्रधान आवास घरकुल योजनेची सोडत रद्द

PC News

एक टिप्पणी द्या