July 26, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

झी-24 तास चे निलेश खरमरे यांची महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेच्या पुणे जिल्हा ‘अध्यक्षपदी’ निवड

पुणे : प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी झी 24 तास वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निलेश खरमरे यांची नियुक्ती करण्यात आली असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक आज बुधवार दि.१४ रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदेचे राज्याचे मुख्य निमंत्रक बापूसाहेब गोरे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,जिल्हा सरचिटणीस सतिश सांगळे,परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार उपाध्यक्ष सूर्यकांत किंद्रे इत्यादी मान्यवर व जिल्ह्यातील असंख्य जिल्हा संघाचे पदाधिकारी व पत्रकार सदस्य उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी भरत निगडे यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली त्यांचा सन्मान व भोर तालुका पत्रकार संघाच्या बिनविरोध निवडलेल्या अध्यक्ष वैभव भुतकर, उपाध्यक्ष संतोष म्हस्के व माणिक पवार, सरचिटणीस (सचिव) पदी स्वप्निलकुमार पैलवान, कोषाध्यक्ष (खजिनदार) पदी किरण दिघे, तर कार्यकारिणी सदस्यपदी सूर्यकांत किंद्रे, नितीन धारणे, चंद्रकांत जाधव व किरण भदे यांची निवड झाली या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मा एस एम देशमुख, मा शरद पाबळे व मा बापूसाहेब गोरे यांनी उपस्थितांना संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन केले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडलेल्या बैठकीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या जिल्ह्यातील व राज्यातील पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीस बापूसाहेब काळभोर (अध्यक्ष- हवेली ता.) अनिल वडघुले(पिंपरी चिंचवड शहर- अध्यक्ष) हणमंत देवकर (हुतात्मा राजगुरू चाकण शहर -अध्यक्ष) हेमंत गडकरी (बारामती ता.अध्यक्ष) राजेंद्र रणखांबे ( वेल्हा ता अध्यक्ष.) संदीप निरजे(खेड ता अध्यक्ष)इत्यादी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष यांच्यासह दादाराव आढावा(जिल्हा प्रतिनिधी) श्रावणी कामत(जिल्हा महिला प्रतिनिधी)आणि इतर पत्रकार संघांचे अध्यक्ष व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य उपस्थीत होते.

बैठकीचे सुत्रसंचलन व सभेचे इतिवृत्त वाचन जिल्हा समन्वयक सुनील जगताप यांनी केले, तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले.

Related posts

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, 4 जण जागीच ठार

PC News

यमुनानगर येथे फी माफीसाठी एसपीएम शाळेसमोर पालकांचे आंदोलन

PC News

ISIS च्या संपर्कात असलेल्या 2 व्यक्तींना पुण्यातून अटक करण्यात आले आहे

PC News

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध:उज्वला गावडे

PC News

पिंपरी चिंचवड मध्ये अजून ६ रुग्ण आढळले

PC News

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या १० झोलर ठेकेदारांवर गुन्हे दाखल,शहरातील अनेक भागात सुरू आहे निकृष्ट दर्जाचे काम,आयुक्तांनी कामाची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी!!!

PC News

एक टिप्पणी द्या