October 23, 2021
जीवनशैली पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

यमुनानगर येथे फी माफीसाठी एसपीएम शाळेसमोर पालकांचे आंदोलन

प्रतिनिधी : निगडी

‘फी माफी सगळी द्या, संकट काळ समजून घ्या’, पालकांचे आंदोलन
नफ्याचा वाटा कमी करा, आम्हाला फी माफी द्या”, ”फी माफी सगळी द्या, संकट काळ समजून घ्या”, ”कडेलोट केला विनंतीचा आता घटनांद फी माफीचा”, ”विनंतीला मान दिला नाही, फी माफिशिवाय थांबणार नाही” अशा जोरदार घोषणा देत एसपीएम पालक असोसिएशनने यमुनानगर येथील एसपीएम शाळेसमोर आज (गुरुवारी) फी माफीसाठी आंदोलन केले.

भोसरी विधानसभेचे  आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, सोमनाथ काळभोर, सुशांत मोहिते स्थानिक नगरसेवक बापू घोलप ऊत्तम केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुळिक, उपाध्यक्ष श्याम मोहिते, सेक्रेटरी अमोल गाडे तसेच नितिन आकोटकर दिपक डोके,पवन देवडे,अभिजित परदेशी , अनिल रोहम यांच्या वतिने शाळेचे मुख्यध्यपक सौ वर्तक मॅडम, बक्षी मॅडम, श्री मुंगसे सर याना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षीच्या फी मध्ये सर्व पालकांना सरसकट 50 टक्के सवलत द्यावी. जोपर्यंत शाळा चालू होत नाही. ऑनलाईन वर्ग होत आहेत. तोपर्यंत शालेय फी 50 टक्के भरण्याची मुभा द्यावी. चालू शैक्षणिक वर्षामधील फी वाढ रद्द झाली पाहिजे. शाळा चालू झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षेत वाढ करावी. शाळा चालू झाल्यानंतर खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करावे. सर्व प्रकारचे मैदानी खेळ सुरु करावेत.

शाळेतील पाण्याचा प्रश्न सोडवावा. स्वच्छता ठेवावी. शाळा चालू झाल्यानंतर कमीत कमी 2 पालक सभा वर्षभरात घ्यावात, अशी मागणी पालक असोसिएशनने केली. याबाबत शाळा व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.आजच्या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने ऊपस्थित होता. आंदोलनाच नियोजन व सुत्र संचालन संतोष मुळिक यानी केले

Related posts

अक्षय चव्हाण युवामंच आयोजित कोरोना जनजागृती अभियान

PC News

लोणावळा, खडकवासला, ताम्हिणी येथे कडक बंदोबस्त, पर्यटकांवर होणार कारवाई

PC News

महाविकास आघाडी सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले – पिंपरी-चिंचवड भाजपकडून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध

PC News

ISIS च्या संपर्कात असलेल्या 2 व्यक्तींना पुण्यातून अटक करण्यात आले आहे

PC News

एकनाथ खडसे यांच्या गाडीचा अपघात

PC News

‘Purpose behind Life Purpose’ या विषयावर शंतनु जोशी सरांचे webinar 

PC News

एक टिप्पणी द्या