September 20, 2021
इतर पिंपरी चिंचवड

उन्नति सोशल फाउंडेशन चा पूरग्रस्तांना मदतीचा हात, अध्यक्षा कुंदा भिसे यांची नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी : पिंपळे सौदागर

मागील काही दिवसात चिपळूण, सातारा, महाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि स्थानिक मनुष्य वस्तीत अतोनात नुकसान झाले आहे. नदी जवळील सर्वच्या सर्व गावे पुराच्या पाण्याखालील आहेत. लोकं आहे त्या परिस्थितीत त्यांची घरे आणि सर्व सामान सोडून शाळा तसेच मंदिरात राहत आहेत.

जाहिरात 👇

उन्नति सोशल फाउंडेशन तर्फे पुरग्रस्थ भागातील लोकांसाठी खालील गोष्टींची व्यवस्था केली जात आहे.

– जेवणासाठी लागणारे साहित्य (तांदूळ, डाळ, इत्यादी)

–  ब्लँकेट्स

– सर्दी, खोकला, Anti-fungal cream, प्राथमिक स्वरूपातील औषधे

– नियमित स्वरूपात लागणाऱ्या घरातील वस्तू

– कपडॆ (कृपया कुणीही जुनी कपडे देऊ नये )

(पैसे स्वीकारले जाणार नाहीत,मदत हि जीवनावश्यक वस्तु रूपात घेतली जाईल)

दरम्यान उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सर्व नागरिकांनी या समाजकार्यास पुढे यावे असे आवाहन केले, तसेच सर्व गोष्टी साठी मदत हवी आहे,  ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढाकार घेऊन वरील गोष्टी आम्हापर्यंत उन्नति सोशल फाउंडेशन कार्यालय ,जरवरी सोसायटी कोटक बँक जवळ पिंपळे सौदागर 27 या ठिकाणी पोच करू शकता, जर कार्यालया पर्यंत आपणास येणे शक्य नसेल तर आम्ही आपल्या पर्यंत येऊन या वस्तु घेऊ शकतो असेेेे ही त्यांनी स्पष्ट केले

Related posts

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, सह्याद्री प्रतिष्ठान व अखिल मातंग समाज खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने 101 बॉटल चे खडकीमध्ये भव्य रक्त संकलन!

PC News

देहू येथे मोफत सॅनिटायजर स्टँडचे आयोजन

PC News

MH-14 च्या वाहनांना सोमाटणे – लोणावळा येथील टोलवर सूट

PC News

दृष्टीहीन समाजात नवी हरित क्रांति घडवतील:पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

PC News

चिंचवड मधील नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी सामाजिक भावनेतून नामवंत डॉक्टरांच्या दवाखाण्याचे उद्घाटन

PC News

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा’ – आप युवा आघाडीची मागणी

PC News

एक टिप्पणी द्या