September 20, 2021
पिंपरी चिंचवड राजकारण

राष्ट्रवादी का भाजप ? नागरिकांमध्ये चर्चा सुरु

पिंपरी : प्रतिनिधी

यंदाची महानगरपालिका निवडणूक कशी होणार, वार्ड पद्धत राहणार का पॅनल पद्धत, राष्ट्रवादी का भाजप अशी चर्चा शहरात नागरिकांमध्ये सुरू आहे.

लवकरच वार्ड रचना जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर सर्व पक्षाचे इच्छूक उमेदवार आपल्या प्रभागात काम करत असल्याचे दिसून येत आहेत, कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश देखील होत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहेत, तर दुसरीकडे पक्षाचे मोठे नेते देखील पिंपरी चिंचवड शहरात दौरे करत आहेत.

सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, २०१७ साल हे पिंपरी चिंचवड शहरासाठी एक परिवर्तनाची लाट घेऊन आला आणि 77 नगरसेवकांसह भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली.

सर्वप्रथम नितीन काळजे यांना महापौर तर शैलजा मोरे यांना उपमहापौर पदाची संधी प्राप्त झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अनेक विकासकामे झाली आणि अनेक प्रकल्प मार्गी लागले तर भाजपच्या काळात देखील अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले असून भावी काळात ते पूर्ण होतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

तर २०२२ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे पहावयास मिळणार आहे. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी जर एकत्र लढणार असल्यास नक्कीच त्याचा फायदा तिन्ही पक्षांना होणार.

Related posts

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करा,सहाय्यक आयुक्त विकास ढाकणे यांना दिले निवेदन!!!: विनोद कांबळे(अध्यक्ष:सामाजिक न्याय विभाग,राष्ट्रवादी काँग्रेस))

PC News

महापालिकेच्या मालकीच्या व्यायाम शाळेवरून महापालिकेचे नाव झाले गायब,आयुक्तांनी नाव टाकण्याचे तातडीने द्यावे आदेश:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

वाकड पोलिसांनी थेरंगाव मधील१०जणांच्या सुमित माने टोळीवर केली मोक्का कारवाई, वाकड पोलीस जोमात!!!

PC News

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला भोसरीत अटक

PC News

स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांच्या प्रयत्नाने १८ते४४वयोगटातील नागरिकांना काका इंटरनॅशनल स्कुल मध्ये मोफत लसीकरण!!!

PC News

राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित देहू येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्वाधिक २३० बाटल्यांची नोंद

PC News

एक टिप्पणी द्या