September 20, 2021
आरोग्य इतर जीवनशैली पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र व्यापार

Before Birth Itinerary या विषयावर sj सरांनी घेतले निवासी शिबिर 

दिनांक २३, २४ व २५ जुलै २०२१ रोजी गरुडमाची,ताम्हिणी घाट येथे ‘Before Birth Itinerary’ या विषयावर निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर (रिट्रीट) फॉग लॅम्प मिशन सेशन्स यांनी आयोजित केले होते. Life Purpose Strategist श्री. शंतनु जोशी उर्फ sj सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.

Advertisement

मानवी शरीरातील आत्म्याचे अस्तित्व, त्या आत्म्याचा आत्तापर्यंतचा प्रवास, आत्म्यावर घडणारे संस्कार, आत्म्यावर करायचे संस्कार, आत्म्याचा पुढील प्रवास सुकर होण्यासाठी या जन्मात करायच्या गोष्टी आणि अशा अनेक अत्यंत अवघड विषयांवर sj सर बोलले. दिसायला सोपी वाटणारी परंतु शिकवलेल्या अवघड संकल्पना मनावर सखोल ठसवणारी प्रात्यक्षिके सरांनी घेतली. आत्म्याच्या उन्नतीसाठी शरीर दिलेले असते त्यामुळे या सुवर्णसंधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. सहभागी व्यक्तींनी प्रश्न विचारून गर्भसंस्कारांचे महत्त्व, पुढील जन्माची आखणी, आत्म्याच्या प्रगतीचे टप्पे, ब्रह्मांडाची कार्यपद्धती असे विषय जाणून घेतले. आत्म्याच्या मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठीचे ध्यान sj सरांनी शिकवले. 

निसर्गाच्या सानिध्यात अद्वैताचे ज्ञान घेणे हा उपस्थितांसाठी एक रोमांचक अनुभव ठरला. ही रिट्रीट निवासी असल्याने संपूर्ण वेळ सरांनी तयार केलेल्या वातावरणाचा लाभ घेता आला. त्यामुळे विषय पूर्णपणे समजून घेण्यास मदत झाली. लहानमोठ्या वयोगटातील विविध क्षेत्रातील व्यक्ती या रिट्रीटला उपस्थित होत्या. 

Related posts

आमच्या दुकानातील म्हैसूर पाक खाल्यास कोरोना बरा होतो असा दावा करणाऱ्या मिठाई दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे. 

PC News

लॉकडाऊन दरम्यान मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे प्रवेश नाही

PC News

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

PC News

सेवा निवृत्त होणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सन्मान

PC News

कोयते दाखवून चिंचवड मध्ये अडीच हजारांची लूट

PC News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पे अँड पार्क ला पतित पावन संघटनेचा विरोध,महापालिका आयुक्तांना दिले निवेदन !!! : राजेश दळशे(अध्यक्ष, पिंपरी चिंचवड)

PC News

एक टिप्पणी द्या