September 20, 2021
खेळ पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शरीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे “ गाथा महाराष्ट्राच्या ऑलिंपिक वीरांची” या कार्यक्रमाचे आयोजन, केशव अरगडे यांची क्रीडा समितीमध्ये निवड

पिंपरी चिंचवड व शरीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आयोजित टोकियो ऑलिंपिक २०२० च्या निमित्ताने खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ‘गाथा महाराष्ट्राच्या ऑलिंपिक वीरांची” या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे करण्यात आले होते.

Advertisement

यावेळी उपस्थितांना भारत विरुद्ध ब्लेजियम या हॉकि च्या ऑलिंपिक उपांत्य फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण राज्य शासनाने सांगितलेल्या कोरोंना विषयक नियमांचे पालन करून दाखविण्यात आले. या कार्यकर्माचे वैशिष्ट्ये म्हणजे हा सामना माजी ऑलिंपिक खेळाडूंच्या उपस्थितीत दाखविण्यात आला. यावेळी १९६४ च्या टोकियो ऑलिंपिक मधील मॅरेथॉन धावपटू श्री बाळकृष्ण आकोटकर तसेच १९७२ च्या म्यूनिच ऑलिंपिक मधील कुस्तीगीर पैलवान श्री मारुती अडकर उपस्थित होते.

ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख श्री मनोज देवळीकर व महासंघाचे शहर अध्यक्ष श्री अंगद गरड यांच्या हस्ते या माजी ऑलिंपिक खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महासंघाचे राज्य अध्यक्ष श्रदचन्द्र धारूरकर, मिलिंद क्षीरसागर, चांगदेव पिंगळे, कविता आल्हाट, भगवानराव सोनवणे, शेखर कुलकर्णी, अनिल नाईकरे, सत्यवान वाघमोडे, राजेंद्र महाजन, रामेश्वर हराळ, लक्ष्मण माने, साहेबराव जाधव, जीवन सोळुंके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी राज्य महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर व उपाध्यक्ष  मिलिंद क्षीरसागर सर यांच्या हस्ते नवीन कार्यकरणी सदस्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली यात साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल मोशी येथील क्रीडा शिक्षक केशव प्रभाकर अरगडे यांची क्रीडा समितीवर नियुक्ती करण्यात आली. राज्य महासंघाचे उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर सर यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र अरगडे यांना देण्यात आले.

याबद्दल साधू वासवनी इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका आरती पाटील व शाळेचे व्यवस्थापक सुधाकर विश्वनाथ यांनी शाळेचे क्रीडा शिक्षक केशव अरगडे यांचे कौतुक केले.

Related posts

आरोग्य हितासाठी निगडी येथील पोलिसांना रोगप्रतिकारक किटचे वाटप

PC News

2022 पर्यंत 30 लाख आयटी (IT) नोकऱ्या जाणार ?

PC News

भारतात ५०००० च्या वर कोरोना रुग्ण

PC News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी राजेश पाटील यांची वर्णी लवकरच

PC News

सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

PC News

आता पिंपरी चिंचवड महापालिका करणार झोपडपट्टी मधील नागरिकांना आर्थिक मदत

PC News

एक टिप्पणी द्या