September 20, 2021
खेळ पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडचे क्रीडा शिक्षक केशव अरगडे यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातून शिक्षण व्याख्याता म्हणून पदवी प्राप्त झाले

जागतिक बुद्धिबळ संघटनेने १८ जून ते २० जून दरम्यान बुद्धिबळातून शिक्षण व्याख्याता (Chess In Education Lecturer) ह्या विषयावर सेमिनार व कोर्स परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

या सेमिनार मध्ये जगभरातून २० जणांची त्यांचा संपूर्ण गोषवारा तपासून निवड केली गेली. यामध्ये आर्मेनिया, कतार, श्रीलंका, केनिया, बल्गेरिया, ऑस्ट्रेलिया सह भारत या देशांतील बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. तीन दिवसीय सेमिनार मध्ये बालवर्गा पासून ते ४थी-५ वी पर्यंतच्या मुलांमध्ये बुद्धिबळाविषयी आवड कशी निर्माण होईल व ती शेवटपर्यंत कशी टिकवता येईल, बुद्धिबळातून इतर शैक्षणिक विषय कसे शिकवता येतील, वर्ग नियोजन, पाठ नियोजन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.

या संपूर्ण सत्रांमधील उत्स्फूर्त सहभाग, प्रकल्प लेखन, ऑनलाईन परीक्षा यामध्ये एकूण १०० पैकी ७० मार्कस् मिळवणाऱ्या सहभागींना Chess In Education – Lecturer टायटल प्राप्त होणार होते. पुणे मोशी येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल चे क्रीडा शिक्षक केशव प्रभाकर अरगडे यांनी ७५% मार्कस् मिळवून हे टायटल प्राप्त केले. त्यांनी बुध्दिबळातून इतिहास या विषयावर प्रकल्प तयार केला. यात सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या अजरामर सिंहगडाच्या युध्दावर अधारीत प्रकल्प तयार केला. केशव प्रभाकर अरगडे यांना या अगोदर एप्रिल महिन्यामध्ये फिडे कडून शालेय बुद्धिबळ प्रशिक्षक पदवी प्राप्त केली आहे. या यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे स्वर्गीय वडील ज्येष्ठ बुद्धिबळ प्रेमी प्रभाकर अरगडे तसेच जिल्हा, राज्य, भारतीय तसेच जागतिक बुद्धिबळ संघटनांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

Related posts

मी सुरक्षित राहणार , इतरांना ही सुरक्षित ठेवणार – शिवसेनेच्या मंदा फड यांचा नारा

PC News

SBIची नवीन दामदुप्पट एफ.डी. योजना, जाणून घ्या फायदे

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

महेंद्र सिंग धोनी यांचे पिंपरी-चिंचवड मधील घर आहे कोठे, हे वाचा

PC News

चापेकर चौकात ७०हजारांची दारू जप्त, सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई!!!

PC News

प्रश्नांच्या गुंत्यामधून विचारांच्या स्पष्टतेकडे घेऊन जाणारी वेबिनार्स 

PC News

एक टिप्पणी द्या