September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

भाजप नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा – आ.अण्णा बनसोडे

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अँटी करप्शन विभागामार्फत काल रात्री कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस असून ना खाऊंगा ना खाने दुंगा हे उद्घोषक वाक्य देऊन सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला असल्याने थोडी नैतिकता शिल्लक असेल तर भाजपा नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा असे मत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.

Advertisement

तसेच, घडलेल्या प्रकाराची सर्वांगीण सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील राज्य शासनाकडे केली जाणार आहे असेेे त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेले अधिकारी पदाधिकारी यांच्यामागे नेमका कुणाचा आधार होता हे शोधणे गरजेचे असून याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात. चौकशीअंती लवकरच सत्य बाहेर येईल; घोषणांचा पाऊस पाडून सत्तेत आलेल्या भाजपाने पदाचा गैरवापर करून शहरातील जनतेच्या पैशाची जी लूट चालवली होती याचा पुरावा आज शहरातील जनतेला मिळाला आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा या लोकांनी घात केल्याचे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे.

खोटे बोलून सत्ता पदरात पाडून घेतलेल्या या लोकांमुळे सर्व बाजूंनी शहरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून, धाडस दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे व लाचलुचपत विभागाचे मी कौतुक करतो.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागच्या 4 – 5 वर्षाच्या भ्रष्ट कारभार व खोटारडेपणा या विषयावर लवकरच अण्णा बनसोडे पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना सांगणार आहेत

Related posts

महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर

PC News

दृष्टीहीन समाजात नवी हरित क्रांति घडवतील:पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

PC News

सुभाष पांढरकर नगरमध्ये दूषित पाणी पुरवठा,नागरिकांचे आरोग्य धोक्यात!!!:निखिल दळवी(राष्ट्रवादी काँग्रेस, उपाध्यक्ष)

PC News

राज्यात 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यास मुख्यमंत्री आग्रही मात्र तज्ज्ञांच्या मते 14 दिवस गरजेचे

PC News

भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे भाजपने राजकारण थांबवावे,उड्डाणपूल सुरू करण्याची राष्ट्रवादीचे मा.सभापती तानाजी खाडे यांची मागणी!!!

PC News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पे अँड पार्क ला पतित पावन संघटनेचा विरोध,महापालिका आयुक्तांना दिले निवेदन !!! : राजेश दळशे(अध्यक्ष, पिंपरी चिंचवड)

PC News

एक टिप्पणी द्या