September 20, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडच्या या अधिकारींची सर्वत्र होत आहे कौतुक, कोण आहेत ते ?

पिंपरी : प्रतिनिधी

सरकारी कामांसाठी नागरिकांना अर्ज देऊन प्रतीक्षा करावी लागते, तर दुसरीकडे एखादी तक्रार नोंदवली की त्यावर समाधान होईल, किंवा कधी होईल ,अशी नागरिकांना शंका असते.

आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोकांना कुठल्याही गोष्टीचं ट्रेंड लगेच माहीत पडतो, कोणाचे गाणे व्हायरल होतात, कोणाचे डान्स फेमस होते तर कोणाचे इतर कामगिरीचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि प्रशंसकांच्या लाईक्स कमेंट्स आणि शेयर्सचा वर्षाव होतो।

Advertisement

त्याच पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम देखील केलं जाऊ शकतं आणि त्यांना एक सुजाण नागरिक असल्याचं समाधान मिळू शकते हे देखील शक्य आहे असे उदाहरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने प्रत्यक्ष करून दाखवले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.अनिल रॉय असे त्यांचे नाव आहे.

फेसबुक या माध्यमाद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं संकल्प डॉ.अनिल रॉय यांनी विचारात आणला. त्यासाठी त्यांनी 2 वर्षांपूर्वी एक फेसबुक ग्रुप सुरू केले. मात्र आज त्यांच्या फेसबुक ग्रुपला 10000 हुन अधिक नागरिक सहभागी आहेत. PCMC health & sanitation solutions असे या ग्रुपचे नाव आहे.

Advertisement

या ग्रुप मध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रार, सूचना अथवा अभिप्राय ते स्वतः वाचतात आणि त्यावर समाधानकारक उत्तर देत तक्रारांवर कारवाही झाल्याचे पुरावेही टाकतात.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी डॉ. अनिल रॉय यांच्या या कामगिरीची प्रशंसा पिंपरी चिंचवडच नव्हे तर सर्वत्र होत आहे आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत इतर विभागांनाही प्रेरित करेल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

Related posts

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, 4 जण जागीच ठार

PC News

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला भोसरीत अटक

PC News

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात 5 पोलीस कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह सापडल्याने प्रेमलोक पार्क परिसरातिल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

PC News

देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत – कुणाल कामरा

PC News

सलग 15व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

PC News

शहरातील खाजगी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरु ठेवावी – आमदार अण्णा बनसोडे यांचे खाजगी डॉक्टरांना आवाहन

PC News

एक टिप्पणी द्या