September 20, 2021
इतर पिंपरी चिंचवड व्यापार

पिंपरी : अजमेरा, मासुळकर कॉलनी पुन्हा नव्याने उजळणार, वाचा कारण

पिंपरी : प्रतिनिधी

घर घेणे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, तर घेतलेले घर आणखी मोठे व्हावे असे प्रत्येकाची आकांक्षा असते.

हीच आकांक्षा आज अजमेरा येथील वस्तू उद्योग कॉलोनीतील नागरिकांचे पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे.

40 वर्षांहून अधिक जुने झालेले इमारतींची पडताळणी महानगरपालिकेकडून केली जाते, यात जे इमारत मजबूत नसतात अथवा धोकादायक असतात त्या इमारतींना / सोसायटींना नोटीस देऊन पुन्हा नव्याने बांधकाम करणायचे आदेश दिले जाते, तर काही सोसायटी आपल्या स्वखुशीने वाढलेल्या F.S.I. (जास्त बांधकाम करण्याची क्षमता)  मुळे एक मोठं घर मिळावं यासाठी बांधकाम करतात अथवा बिल्डर /डेव्हलपर ला सोपवून बांधून घेतात.

या मध्ये बिल्डर आणि मुळ सोसायटी धारक या दोघांना याचा फायदा होतो. याच पद्धतीने अजमेरा, मासुळकर कॉलनी येथील वास्तू उद्योग सोसायटीच्या फ्लॅट धारकांनी याची सुरुवात केली आहे.

वास्तू उद्योग येथील फ्लॅट धारकांना या वाढलेल्या FSI मुळे बिल्डर कडून 1 ऐवजी 2BHK घरं मिळणार आहेत. अजमेरा येथील ही पहिली सुरुवात असून इतर सोसायटी देखील यासाठी इच्छूक आहेत असे दिसून येत आहे.

नव्याने पुनर्वसन होत असल्याने अजमेरा येथील इमारती सध्यापेक्षा अधिक मोठ्या आणि आकर्षक होतील तसेच इतर नागरिकांनाही येथे फ्लॅट घेण्याची संधी मिळेल.

यामुळे अजमेरा – मासुळकर कॉलनी हे नव्याने पुन्हा उजळणार ही बाब नाकारता येत नाही.

Related posts

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या ठेकेदार संजीव चिटणीस यांच्यावर गुन्हा दाखल, अभियंता प्रविण लडकत यांनी दिली फिर्याद!!!

PC News

पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ मधील शासकीय कार्यालयात बोगस आरटीआय कार्यकर्त्यांचा सुळसुळाट,बोगसगिरी करणारी टोळी पुन्हा सक्रिय,पोलीसांना कारवाईची मागणी!!!

PC News

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन च्या वतीने डॉक्टरांचा सन्मान, आणि वृक्षारोपण!!!

PC News

पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता पालट होणार का? विकास कामांना लागला ब्रेक

PC News

चुकीच्या माहिती मुळे इंदिरानगर दळवीनगरच्या नागरिकांमध्ये घबराट

PC News

काँग्रेसचे स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबियांची महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांनी घेतली भेट,काँग्रेस पक्ष नेहमी आपल्या सोबतच!!!

PC News

एक टिप्पणी द्या