January 23, 2022
जीवनशैली दुनिया पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र

प्रश्नांच्या गुंत्यामधून विचारांच्या स्पष्टतेकडे घेऊन जाणारी वेबिनार्स 

 

१, ५, ७ व ८ ऑगस्ट २०२१ रोजी Clutter to Clarity या विषयांतर्गत प्रत्येकी दोन तासाची चार आगळी वेगळी वेबिनार्स संपन्न झाली. फॉग लॅम्प मिशन सेशन्स ने आयोजित केलेल्या या हिन्दी वेबिनार्स मध्ये अनुक्रमे लग्न आणि नातेसंबंध, मन आणि स्वास्थ्य, अध्यात्म आणि परंपरा, व संपत्ती, व्यवसाय आणि उद्योजकता या विषयांवर प्रश्नोत्तरे झाली. पूर्वनियोजित तसेच वेबिनार दरम्यान विचारल्या गेलेल्या प्रश्नांना श्री. शंतनू जोशी (Life Purpose Strategist- sj) सरांनी उत्तरे दिली.  

 

तरूणांसमोर असलेले नातेसंबंधांचे पर्याय, लग्नसंस्थेचा पाया, स्वस्थ मन, स्वप्नांमागचे विज्ञान, वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी आणि परंपरांचा उलगडा, गुरुतत्व, सजीव लक्ष्मी, संपत्तीचा अर्थ अशा विविध मुद्द्यांवर या वेबिनार्समध्ये चर्चा झाली. या वेबिनार्समध्ये विचारण्यात आलेले  सर्व प्रश्न उपस्थित श्रोत्यांमधूनच आलेले होते. काही प्रश्न हे वेबिनार्सपूर्वी sj सरांपर्यंत इमेल्सद्वारे पोहचवण्यात आले होते तर काही प्रश्न वेबिनार्स दरम्यान विचारण्यात आले. या वेबिनार्समध्ये सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते. sj सरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कठीण विषय सहज सोपे करून सांगण्याची शैली यामुळे कधीही न सांगितलेले वास्तव समजले असे उपस्थितांनी नोंदवले.  

 

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक लहानथोर व्यक्तींनी Clutter to Clarity या सेशन्सचा लाभ घेतला. ५ सप्टेंबर २०२१ रोजी गणेश तत्व या विषयावर पुढील वेबिनार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

 

For more information, visit our YouTube channel: t.ly/CUR9

Contact us at: fuelingdestinies@gmail.com 

 

Related posts

महापालिकेच्या कोव्हिडं सेंटर मध्ये बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती, दिपक मोढवे पाटील यांच्या मागणीला मंजुरी!!!

PC News

पिंपळे सौदागर मध्ये अंतर्जातिय प्रेमप्रकरण असल्यामुळे तरुणाचा खून

PC News

राम मंदिर भूमीपूजनानिमित्त अनुप मोरे यांच्या कार्यालयात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आले

PC News

रावेत मध्ये होणार पुण्यातील सर्वात उंच इमारत

PC News

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना लाठी- काठी चे प्रशिक्षण !

PC News

वयाने 27 वर्ष लहान असलेल्या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न करणारे ‘ते’ मुख्यमंत्री कोण आहेत ?, पहा फोटो…

PC News

एक टिप्पणी द्या