September 20, 2021
जीवनशैली

गणेशोत्सवापूर्वी शंतनू जोशी sj सरांनी समजावले गणेश तत्व 

  पृथ्वीच्या प्रत्येक कणाकणात वसलेल्या उर्जेचा ईश म्हणजे गणेश. गणेश तत्व बुद्धी आणि सर्जनशीलतेचे तत्व आहे. पृथ्वीवर वर्षातील इतर दिवसांच्या तुलनेत गणेशोत्सवाच्या काळात हे तत्व १००० पट जास्त असते. गणेश तत्वाचा अंश आपल्यामध्ये कसा आणायचा हे श्री. शंतनू जोशी (Life Purpose Strategist sj) सरांनी रविवार,

Advertisement

५ सप्टेंबर २०२१ रोजी ‘गणेश तत्व’ या वेबिनारमध्ये शिकवले. हे वेबिनार फॉग लॅम्प मिशन सेशन्स तर्फे आयोजित करण्यात आले होते. 

    या वेबिनारच्या उद्देशाबद्दल सांगताना sj सर म्हणाले,‘कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला जितकी जास्त माहिती असते तितक्या लवकर आपण तिच्याशी जोडले जाऊ शकतो. गणेशोत्सवाच्या काळात पृथ्वीवर असलेल्या गणेश तत्वाकडून अधिकाधिक ऊर्जा मिळवण्यासाठी त्याच्याबद्दलची खरी माहिती करून घेणे गरजेचे आहे.’ 

    गणपतींची तारक व मारक रूपे, गणेशोत्सव साजरा करण्याचे कारण,  मूर्तिपूजेची गरज, गणेश प्राणप्रतिष्ठापनेची पद्धत, गणेशोत्सवादरम्यान करायची उपासना, गणेश विसर्जनाचा हेतू इत्यादि विषयांवर सरांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. भारताबाहेर स्थित व्यक्तींनी मर्यादित साधने असताना गणेश तत्वाची साधना कशी करावी हे जाणून घेतले. या सत्राच्या शेवटी गणेशोत्सवात करायचे ध्यान sj सरांनी शिकवले. 

यापुढील वेबिनार ‘Bliss called Laziness’ या विषयावर ३ ऑक्टोबर २०२१, रविवार रोजी असल्याचे आयोजकांनी नमूद केले. 

 

For more information, visit our YouTube channel: t.ly/CUR9

Contact us at fuelingdestinies@gmail.com 

 

Related posts

महापालिका कर्मचाऱ्यांना वारस हक्क मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ करणार पाठपुरावा!!!:अंबर चिंचवडे(अध्यक्ष, पिं. चिं.महापालिका कर्मचारी महासंघ)

PC News

सोशल डिस्टन्सिंग पाळून सांगवीत विवाह सोहळा संपन्न

PC News

थेरंगाव येथे अपना वतन संघटनेचे हमीदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!!!

PC News

मॉन्सून मुंबईत कधी होणार दाखल ?

PC News

लॉकडाउनमध्ये 1 महिना पूर्ण , लोकांची जीवनशैली बदलली; ओटीटी फॅमिली थिएटर बनली, कमीत जगण्याची सवय

PC News

“कठीण प्रसंगातून पुढे जाण्यासाठी शंतनु जोशी यांनी दाखवला अनोखा मार्ग”  

PC News

एक टिप्पणी द्या