December 8, 2021
आरोग्य इतर भारत

मास्क आणखी वर्षभर बंधनकारक : डॉ. व्ही.के.पॉल

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी भाष्य केले आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती आणि घटती संख्या पाहाता पुढील वर्षापर्यंत मास्क घालावे लागेल. तसेच, कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही, असे डॉ. पॉल यांनी म्हटले आहे.

Advertisement

 

डॉ. पॉल म्हणाले की, मास्क परिधान करणे आता बंद होणार नाही. पुढील काही काळासाठी किंवा पुढच्या वर्षांपर्यंत सुद्धा आपल्याला मास्क घालावे लागतील. कारण कोरोना विरूद्ध लढा केवळ शिस्त, लस आणि प्रभावी औषधांद्वारे जिंकला जाऊ शकतो. मला विश्वास आहे की या साथीच्या वेळी आपण त्यावर मात करू.

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेबद्दल विचारले असता, डॉ. पॉल म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट नाकारता येत नाही. पुढील तीन-चार महिने खूप महत्वाचे आहेत. आम्हाला स्वतःचे संरक्षण करणे आणि उद्रेक टाळणे आवश्यक आहे. आगामी सणासुदीच्या काळात सुरक्षा कमी करण्याबाबत सावध केले. असे केल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो.

Advertisement

दरम्यान, कोविड प्रोटोकॉलमध्ये मास्क घालणे, सॅनिटायझरने हात धुणे, सोशल डिस्टंसिंग इत्यादींचा समावेश आहे. मास्क घालणे हा संसर्गजन्य रोगांचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती.

Related posts

पुणे,पिंपरी चिंचवड पश्चिम महाराष्ट्र सोशल फाऊंडेशन ची स्थापना, सभासद होण्याचे आवाहन:रणजित औटी,(अध्यक्ष)

PC News

कोण करत आहेत आयुक्तांच्या बदलीची मागणी ?

PC News

प्रत्येक प्रभागात आद्यवत कोव्हिडं सेंटर उभारा:भाग्यदेव घुले

PC News

सीबील स्कोर (Cibil Score) सुधारण्यासाठी करा हा उपाय !

PC News

आकुर्डी मध्ये जनसेवा प्रतिष्ठान तर्फे १महिन्यापासून मोफत अन्नदान:मंदार कुलकर्णी, जनसेवा प्रतिष्ठान

PC News

फॉग लॅम्प मिशन सेशन तर्फे “लॉकडाऊन टू नॉक डॉन” या विषयावर वेबिनार आयोजित

PC News

एक टिप्पणी द्या