December 8, 2021
इतर पिंपरी चिंचवड राजकारण

निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का आश्वासन ?

पिंपरी : प्रतिनिधी

2017 च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात एक नवा बदल दिसून आला. भारतीय जनता पार्टीने इतिहास रचून एक हाती सत्ता स्थापन केले आणि याचे श्रेय चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना देण्यात आले.

Advertisement

भरपूर नवे चेहऱ्यांना संधी देण्यात आली आणि ते यशस्वी रित्या निवडून देखील आले. मात्र या नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने निष्ठावन्त भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध दिसून आला होता

पक्षाकडून जुने कार्यकर्त्यांना संधीची अपेक्षा असते, मात्र पक्षाकडून काहींना दुर्लक्षित करण्यात आले होते, बरेच जुने कार्यकर्त्यांचे तिकीट डावलले गेले होते.

काहींनी बंडखोरी केली, काहींनी राजीनामा दिला तर पक्षप्रेमी कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी सांभाळत पुन्हा पुनर्वसन केली जाईल या आश्वासनावर पक्षाने दिलेल्या  उमेद्वारांचे काम केले.

Advertisement

पुन्हा एकदा महानगरपालिका 2022 च्या निवडणुका तोंडावर आले आहेत आणि सर्व पक्षाच्या इच्छूकांनी कामाला सुरुवात केली आहे. या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी संपूर्ण जोर लावणार आहे अशी सर्वत्र चर्चा आहे तर महापालिकेत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी देखील तयारीने रिंगणात उतरणार.

इच्छूकांची संख्या वाढण्याची शक्यता आहेच परंतु जुने निष्ठावन्त कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related posts

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला भोसरीत अटक

PC News

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा,उपक्रमाचे कौतुक,अनेक मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

PC News

आळंदी : दगडाने ठेचून एकाचा खून

PC News

‘५ कोटी द्या, नरेंद्र मोदींची हत्या करतो’

PC News

टि.ई.टी परिक्षेच्या वेळापञकात बदल करण्याची मागणी

PC News

कोरेगाव तालुका भाजप महिला अध्यक्ष पदी हेमलता पोरे यांची बिनविरोध निवड, खा.छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी केले अभिनंदन!!!

PC News

एक टिप्पणी द्या