January 23, 2022
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

प्रहारला खिंडार पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज बगाडे यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश

पुणे/पिंपरी चिंचवड :- पुणे शहरातील प्रहार संघटनेमध्ये पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदावर कार्यरत असलेले कु.पंकज रावसाहेब बगाडे यांनी आज (दि.६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे प्रवेश केला. कार्याध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याने आता प्रहारला खिंडार पडले असून आपल्या घामाने प्रहार गावागावात, शहरात पोहचवली त्यांनीच प्रहार विरुद्ध एल्गार पुकारल्याचे दिसत आहे. प्रहार पक्ष गत काळात विरोधात असताना जे कार्यकर्ते ठाम उभे होते, त्यांनी अचानक सत्तेत असताना उचललेले पाऊल प्रहार पक्षावर नक्कीच प्रहार करणारे असल्याचे बोलल्या जात आहे. बगाडे यांच्या मागे जनाधार असल्यामुळे त्याचा फायदा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे.

Advertisement

यावेळी संजोग वाघेरे बोलताना म्हणाले की,बगाडे यांनी प्रवेश केल्यामुळे त्यांचं स्वागत आहे. येणाऱ्या महानगरपालीका निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छूक आहेत.तरुण पिढीने राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीसाठी काम केले पाहिजे.नव्या दमाच्या तरुणांना राष्ट्रवादीत घेऊन राष्ट्रवादीची टीम सक्रिय केली आहे. येणाऱ्या काळात पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी मा शरद पवार यांच्या विचारांचा अजेंडा घराघरात पोहचवल्यास २०२२ चा पिंपरी-चिंचवड शहराचा महापौर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा असेल.

चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा कायापालट केला.शहरातील एमआयडीसी भागातील कारखाने,उद्योग धंदे यांना चालना मिळाली.आता ही राज्यातील सत्तेत असताना विकासाची गंगा वाहत आहे. मा शरद पवार यांचे विचार,अजित पवार यांनी शहरात केलेल्या कामामुळे प्रभावित होऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात पक्ष बांधणीसाठी काम करणार आहे असा विश्वास पंकज बगाडे यांनी व्यक्त केला.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे,ऋषिकेश दादा काशीद अध्यक्ष कुंभार समाजोन्नती मंडळ पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा,महेश पानस्कर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी माथाडी पिंपरी-चिंचवड,उद्योजक गौरव शेठ अग्रवाल, उद्योजक सुरज बगाडे, उद्योजक ऋषिकेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते अजय कंट्रोलू इ.उपस्थित होते.

Related posts

पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी दिलीप पांढरकर यांचे नाव आघाडीवर, आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर निवडीची शक्यता!!!

PC News

राष्ट्रवादीने एनडीए सोबत यावं – रामदास आठवले

PC News

योगेश जाधव व मित्र परिवाराच्या सामाजिक कार्यास सलाम – आमदार सुनील शेळके

PC News

1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम

PC News

पोलादपूर तालुक्यातील पैठण गावचे १००%कोव्हिडं लसीकरण पूर्ण!!!

PC News

बालेवाडी : भरधाव वाहनाच्या धडकेत एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू

PC News

एक टिप्पणी द्या