December 8, 2021
जीवनशैली दुनिया

शंतनु जोशी सरांनी सांगितले आळसाचे खरे उद्देश्य 

दिनांक ३ ऑक्टोबर २०२१, रविवार रोजी ‘Bliss called Laziness’ (आळस नावाचा परमानंद) या विषयावर श्री. शंतनू जोशी (The Life Purpose Strategist sj) यांचे वेबिनार झाले. हा कार्यक्रम फॉग लॅम्प मिशन सेशन्स तर्फे आयोजित करण्यात आला होता. 

Advertisement

आळस हा माणसाचा शत्रू नसतो तर तो मनाचा दूत असतो. आळस येत असेल तर आपले मन आपल्याला काय सांगू इच्छित आहे हे ओळखायला व आपल्या उन्नतीसाठी आळसाचा वापर करायला sj सरांनी या वेबिनारमधे शिकवले. जेव्हा आपण आपल्या जीवन उद्देश्याशी निगडीत कार्य करत असतो तेव्हा आपल्याला आळस येत नाही असेही त्यांनी सांगितले. 

या वेबिनारमधे दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आळशीपणाची लक्षणे आपल्याला जाणवतील तेव्हा करण्यासाठीची प्रात्यक्षिके करून घेतली. या वेबिनारमधे मिळालेल्या माहितीमुळे उपस्थित व्यक्ती व त्यांच्या जवळच्या व्यक्तींना आळसाला सामोरे जाण्यास मदत होणार आहे. विविध देशातील अनेक व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. 

‘आदिशक्ती मेडिटेशन’ हे खास नवरात्रीत करायचे ध्यान पुढील रविवारी, दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी sj सर शिकवणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

For more information, visit our YouTube channel: http://t.ly/CUR9  

Related posts

मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये फेब्रुवारी महिन्यातील सर्व ‘डे’ वृद्ध मंडळी समवेत साजरे करण्यात आले

PC News

“Before we were our Bodies” या विषयावर श्री. शंतनु जोशी ह्यांचे वेबिनार 

PC News

महाराष्ट्र राज्य व्यवसायिक पुरस्कारने महिलांचा सन्मान, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते वितरण

PC News

गणेशोत्सवापूर्वी शंतनू जोशी sj सरांनी समजावले गणेश तत्व 

PC News

ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

PC News

सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट वतीने मंदिरातील पुजारी,कर्मचारी,आणि विश्वस्त यांना लसीकरणसाठी प्राधान्य देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी !!!: विजय कुमार पोरे(अध्यक्ष:सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य)

PC News

एक टिप्पणी द्या