January 23, 2022
भारत महाराष्ट्र व्यापार

न्यूज वेब पोर्टलला मान्यता आहे का ?

संपूर्ण जगात सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढलेला आहे हे आपल्याला माहीतच आहे, तर या जलद गतीने वाढणाऱ्या या सोशल मीडियाच्या युगात लोकांपर्यंत संदेश पोहचवणे त्यांच्याशी जोडून राहणे हे अगदी सोपे झाले आहे.

Advertisement

या सोशल मीडियाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे. प्रत्येक व्यावसायिक हा कोणत्या न कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायाचे जाहिरात करण्यासाठी प्रयत्नशील असतो.

तर न्यूज पोर्टल देखील सोशल मीडियाचा वापर करताना सर्वत्र दिसून येत आहेत आणि नागरिकांपर्यंत लवकरात लवकर बातमी पोहचवता यावी यासाठी वापरले जाणारे हे एक जलद माध्यम आहे, एवढेच नव्हे तर भारतातील असलेले सर्व वर्तमानपत्रांनी देखील सोशल मीडियावर आपले अस्तित्व कायम केले आहे.

आज वर्तमानपत्राचे जितके महत्व आहे तितकेच महत्व सोशल मीडियाला नागरिकांकडून मिळत आहे हे म्हणायला हरकत नाही. कोणतीही बातमी वर्तमानपत्रात येण्याअगोदर सोशल मीडियावर पाहिले व्हायरल होते.

मात्र सोशल मीडियावर आज प्रचंड न्यूज पोर्टल झाले आहेत तसेच वेब पोर्टल देखील तितकेच झाले आहेत आणि दिवसंदिवस ही संख्या वाढतच चाललेली आहे.

केंद्र सरकारने वेब पोर्टल आणि सोशल मीडिया वर सुरू असलेल्या चॅनल साठी आता पर्यंत कोणतेही नोंदणीकरण  अथवा कायदा जाहीर केलेला नाही मात्र यावर चर्चा सुरू आहे आणि लवकरच निर्णय येणाची शक्यता आहे. कोणतीही नोंदणीकरणाची प्रक्रिया नसली तरीही सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने पथक नेमले आहेत.

सोशल मीडिया फायद्याचे असले तरी त्याचे गैरवापर देखील केले जाऊ शकते यासाठी लवकरच कायदा येण्याची शक्यता आहे, परंतु कायदा अस्तित्वात येईपर्यंत सर्व वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनल चालवण्यावर बंदी नाही.

सूट जरी असली तरी कायद्याच्या अंतर्गत वेब पोर्टल अथवा चॅनल चालवणे आवशक्य आहे अथवा चुकीची माहिती, आक्षेपार्ह माहिती प्रसारित करण्यासाठी चॅनलवर कारवाही करण्याचे अधिकार सरकारकडे आहेत.

 

Related posts

24 तासांत भारतातील कोरोना केसेसची सर्वांत कमी दैनिक वाढीची नोंद

PC News

युनिव्हर्सिटी चौकातील पूल होणार जमीनदोस्त?

PC News

धक्कादायक घटना : बेड न मिळाल्याने ४१ वर्षीय महिलेची आत्महत्या

PC News

३१ मार्चला (PMAY) पंतप्रधान आवास योजना होणार बंद

PC News

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा : देवेंद्र फडणवीस

PC News

2022 पर्यंत 30 लाख आयटी (IT) नोकऱ्या जाणार ?

PC News

एक टिप्पणी द्या