January 23, 2022
आरोग्य जीवनशैली दुनिया

शंतनु जोशी सरांनी शिकवले ‘प्रेरणा’ ही भावना समजून घ्यायला

 

Motherly Wisdom Sessions अंतर्गत ‘Made to order Motivation’ हे वेबिनार दिनांक १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी आयोजित केले होते. श्री. शंतनु जोशी (Life Purpose Strategist, sj ) सरांनी बालदिनाचे औचित्य साधून वेबिनारच्या सुरुवातीलाच सर्वांना लहान मुलांसाठी संकल्प करायला सांगितला. या वेबिनारमध्ये शिकलेली कोणतीही एक महत्त्वाची गोष्ट बारा वर्षांखालील एका लहान मुलापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प प्रत्येकाने केला. या वेबिनारला देशविदेशातून, सर्व वयोगटातील व्यक्ती उपस्थित होत्या. 

Advertisement

वेबिनारमध्ये motivation म्हणजेच प्रेरणा ही संकल्पना स्पष्ट करताना sj सरांनी असे सांगितले की, “कोणतेही काम करण्यासाठी प्रेरणेची वाट पाहू नका. तर ते काम दररोज एकाच वेळेस नियमितपणे करण्याची स्वतःला सवय लावा. या केलेल्या कामातूनच पुढच्या कामासाठी प्रेरणा मिळते. ही प्रेरणा स्वतःच्या आतूनच यायला हवी व तिचा ताबाही स्वतःकडेच असायला हवा.” 

जशी सवयीने त्या त्या वेळेस भूक लागते, झोप येते तशीच सवयीने प्रेरणासुद्धा मिळवता येते. ती कशी मिळवायची हे sj सरांनी प्रात्यक्षिकातून समजावून दिले. दैनंदिन जीवनातील अत्यंत सोपी, सहज उदाहरणे देऊन त्यांनी वेबिनारची लज्जत अजूनच वाढवली. 

यापुढील Motherly Wisdom session हे Witty Spirituality या विषयावर आयोजित केले आहे. हे session डोंबिवली येथे प्रत्यक्षरित्या २८ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न होईल. आगामी वेबिनार हे Fog Lamp Mission Sessions तर्फे Men and Women decoded या विषयावर ४ आणि ५ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित होणार आहे. 

अधिक माहितीकरिता: https://www.sjsfuelingdestinies.com/ 

  

 

Related posts

पिंपरी चिंचवड मध्ये अजून ६ रुग्ण आढळले

PC News

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन च्या वतीने डॉक्टरांचा सन्मान, आणि वृक्षारोपण!!!

PC News

प्रत्येक प्रभागात आद्यवत कोव्हिडं सेंटर उभारा:भाग्यदेव घुले

PC News

पिंपरी चिंचवडच्या या अधिकारींची सर्वत्र होत आहे कौतुक, कोण आहेत ते ?

PC News

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा कडून सन्मान आणि स्वर्गीय श्याम मुखर्जी दिनानिमित्त वृक्षारोपण !!! :उज्वला गावडे(अध्यक्षा भाजप महिला मोर्चा)

PC News

वेबिनारच्या माध्यमातून शंतनु जोशी सरांनी दिली संकटांकडे बघण्याची नवी दृष्टी 

PC News

एक टिप्पणी द्या