January 23, 2022
इतर पिंपरी चिंचवड

शहरातील कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्याची मागणी..


पिंपरी चिंचवड शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांना रंगरंगोटी सुरू आहे.
प्रत्येक झाडाच्या सभोवती किमान ५० जीवांचे अस्तित्व असते. त्या जीवांना या रंगामुळे धोका निर्माण होऊ शकतो.एकूणच, अनेकांना आकर्षक वाटणारी रंगरंगोटी झाडांचा आणि त्या ५० जीवांचा अपमान आहे. त्यांचे अस्तित्व हिरावून घेण्यासारखे आहे. झाडाभोवती असणारी जैवविविधता या रंग दिल्याने धोक्यात येणार आहे
सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांचा सन्मान हिरावून घेऊ नका असे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव धनवे पाटील आपल्या निवेदनात म्हणाले. तसे निवेदन त्यांनी पिंपरी चिंचवड चे महापौर माई ढोरे यांना दिले.
पुढे माधव पाटील असेही म्हणाले की झाडांना रंगरंगोटी चुकीची वाटत नसेल तर शहरातील सर्व कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्यात यावा. काय चूक काय बरोबर याचा विचार करून झाडाबाबत प्रशासनाने विचार करावा.
एका झाडाभोवती किमान ५० जीवांचे अस्तित्व असते याचा विसरही प्रशासनाला पडला आहे. झाडांचे आकर्षक रंग पाहून सरड्यालाही आपण असा रंग कसा बदलावा असा प्रश्न पडला असेल, कंत्राटदारासकट पालिकेचे अनेक अधिकारी म्हणतात की हा रंग पाण्याने धुतला जातो. पण, फक्त पाणीच काय त्याला घास घास घासले तरी तो रंग जात नाही.पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि झाडांना सन्मान मिळावा हा हेतू या निवेदनामागे असल्याचे माधव पाटील यांनी सांगितले.
महापौरांनी सुद्धा यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल,तसेच ही रंगरंगोटी थांबवण्यात येईल असे आश्वासन दिले.

Related posts

शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करा:दिपक मोढवे

PC News

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

PC News

महापालिकेच्या मालकीच्या व्यायाम शाळेवरून महापालिकेचे नाव झाले गायब,आयुक्तांनी नाव टाकण्याचे तातडीने द्यावे आदेश:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

महेंद्र सिंह धोनी नंतर आता एकता कपूर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन

PC News

पंकज बगाडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

PC News

दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे आंदोलन!!!:विनोद कांबळे(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सामजिक न्याय विभाग)

PC News

एक टिप्पणी द्या