January 23, 2022
खेळ पिंपरी चिंचवड

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना लाठी- काठी चे प्रशिक्षण !

भाजपा महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष  शैला मोळक यांचा उपक्रम !! महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. स्वतःचे स्व-संरक्षण करण्यासाठी ही त्यांनी सज्ज राहिले पाहिजे. त्यासाठी कराटे, लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्याअनुषंगे महिला प्रदेश आघाडीच्या कोषाध्यक्षा शैलाताई मोळक यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित महिला व मुलींसाठी लाठी-काठी चालविणे प्रशिक्षणाचे आयोजन करून महिलांना स्व-संरक्षणासाठी एक संधी निर्माण करून दिली असल्याचे मत माजी महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

चर्होली येथे आयोजित लाठी-काठी चालविणे प्रशिक्षणाचे उदघाटन करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेश कोषाध्यक्षा शैलाताई मोळक, प्रदेश सदस्य कोमल काळभोर, शहर भाजपचे कोषाध्यक्ष सचिन तापकीर, स्वीकृत सदस्य अजित बुर्डे, रामदार काळजे, उद्योजक नंदकुमार दाभाडे, रमेश तापकीर,सुरेश निकम , शंकर वाहिले, बजरंग वाहिले, सारिका संतोष तापकीर, व्यापारी आघाडीचे दत्ता तापकीर, ऍड संदीप तापकीर, प्राजक्ता तापकीर, राजाभाऊ तापकीर, प्रवीण तापकीर, यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने महिला आणि मुली उपस्थित होत्या. हे प्रशिक्षण चार रविवारी चालणार आहे.

Related posts

आमादर सुनिल शेळके यांच्या वरील बिनबुडाचे आरोप खपवून घेतले जाणार नाही, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू – प्रकाश हगवणे .

PC News

अमित मेश्राम मित्र परिवाराचे दररोज मोफत अन्नदान

PC News

सुभाष पांढरकर नगरमध्ये दूषित पाणी पुरवठा,नागरिकांचे आरोग्य धोक्यात!!!:निखिल दळवी(राष्ट्रवादी काँग्रेस, उपाध्यक्ष)

PC News

आळंदी : दगडाने ठेचून एकाचा खून

PC News

सांगवीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या १६ नायजेरियन तरुणींना अटक

PC News

कोरोनाच्या नावाखाली खरेदीत वस्तूंमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची कधी करणार आयुक्त चौकशी? मा.आमदार विलास लांडे यांची मागणी

PC News

एक टिप्पणी द्या