January 23, 2022
आरोग्य

एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांबद्दल जाणून घ्यायला हवे – श्री. शंतनु जोशी

दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी ‘Men and Women Decoded’ या विषयावर वेबिनार झाले. यामध्ये Life Purpose Strategist श्री. शंतनु जोशी (sj) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हे वेबिनार Fog Lamp Mission Sessions तर्फे आयोजित करण्यात आले होते.

प्रत्येक व्यक्तिमध्ये स्त्री आणि पुरूषांचे गुण वेगवेगळ्या प्रमाणात असतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्वाची लक्षणे कोणती असतात, त्यांचे नैसर्गिक गुणधर्म काय असतात व ते कसे हाताळायचे हे sj सरांनी समजावून सांगितले. एकमेकांबद्दल जाणून घेतल्यानंतर एकमेकांना समजून घ्यायला सोपे जाईल असे ते म्हणाले. 

 

दोन्ही दिवशीच्या सत्रांमध्ये विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली. उपस्थितांच्या अनुभवांचा कौशल्याने उपयोग करून त्यामार्फत sj सरांनी त्यांचे मुद्दे उलगडले. सर्व उपस्थितांनी प्रात्यक्षिके करताना उत्साहाने सहभाग घेतला. या वेबिनारमुळे सर्व नात्यांमध्ये चांगला बदल घडेल व नाती आणखी घट्ट विणण्यास मदत होईल असे उपस्थितांनी नोंदवले. तसेच स्त्रीत्व आणि पुरुषत्व, दोन्हींबद्दल माहिती करून घेतल्यामुळे स्वतःची ओळख व्हायला मदत होईल असेही सांगितले. 

 

२४ ते २६ डिसेंबर २०२१ रोजी ‘श्री महालक्ष्मीः उवाच’ हे निवासी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले. 

 

अधिक माहितीकरीता www.sjsfuelingdestinies.com इथे भेट द्या. 

Related posts

पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा सध्या 115

PC News

होळी साजरी करण्यावर पुणे जिल्ह्यात बंदी

PC News

शहरातील मधुमेही रुग्णांना लसीकरण मध्ये प्राधान्य द्यावे:दिपक मोढवे पाटील

PC News

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मिनरल वॉटर नव्हे !

PC News

स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांच्या प्रयत्नाने १८ते४४वयोगटातील नागरिकांना काका इंटरनॅशनल स्कुल मध्ये मोफत लसीकरण!!!

PC News

तळेगावत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला

PC News

एक टिप्पणी द्या