January 23, 2022
खेळ

ऑलम्पिक ची देशाने,शहराने स्वप्न बघताना त्याच्या वस्तुस्थिती वर पण प्रकाश टाकणे आवश्यक आहे

ऑलम्पिक ची देशाने,शहराने स्वप्न बघताना त्याच्या वस्तुस्थिती वर पण प्रकाश टाकणे आवश्यक आहे.

यात विविध बाजुने आपण आपल्या देशातल्या खेळाडूंना तयार करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो.

Advertisement

हे करत असताना देशाची वैचारिकता,आर्थिक,सामाजिक व मानसिक बाजूदेखील तेवढीच महत्वाची आहे. एखादा खेळाडू तयार करताना त्या खेळाडूची स्वतःची विचारधारा व संबंधित परिसरातील विचारधारा देखील तेवढीच महत्वाची आहे. ज्या वेळेला एक खेळाडू तयार होतो,त्याच्यामागे एक मोठी अदृश्य अशी एक सेना कार्यरत असते,ही सेना कार्यरत होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या देशातील खेळाडूंचा सन्मान करणे गरजेचे आहे.

भविष्यात क्रीडा हा प्रकार देशाच्या आर्थिक गणितांना सहकार्य करणारा एक मोठा घटक असणार आहे यात शंकाच नाही. या क्षेत्राकडे अजून सुद्धा आपल्या देशातील बरेच व्यावसायिक कानाडोळा करतात,कारण आपल्या देशातला खेळाडूंचा दृष्टीकोन अजून बदललेला नाही.

लवकरच आपण ऑलम्पिक म्हणजे नक्की काय ? ते का खेळले जाते ? त्याच्या मागची गणिते तसेच, यासाठी लागणारी तयारी यावर आपण चर्चा करणार आहोत.या संदर्भातले प्रश्न आपण नक्कीच मांडू शकता त्यावर सुद्धा चर्चा करण्यासाठी नक्की आवडेल.
क्रमशः

हर्षद कुलकर्णी,
क्रिडा मार्गदर्शक.

Related posts

त्याने देशाला ‘वर्ल्डकप’ जिंकून दिला मात्र आज करतोय ‘मजुरी’

PC News

पुणे : सचिन तेंडुलकर वर होणार का कारवाई ?

PC News

ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

PC News

धोनींची निवृत्तीची घोषणा, सचिन तेंडुलकर म्हणतात…

PC News

पिंपरी चिंचवडचे क्रीडा शिक्षक केशव अरगडे यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळातून शिक्षण व्याख्याता म्हणून पदवी प्राप्त झाले

PC News

महेंद्र सिंग धोनी यांचे पिंपरी-चिंचवड मधील घर आहे कोठे, हे वाचा

PC News

एक टिप्पणी द्या