January 23, 2022
गुन्हा पिंपरी चिंचवड

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटकडे पोलिसांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी : चिंचवड

महानगरांमध्ये गाड्यांची संख्या भरपूर आहे, तसेच ही संख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुरेसे नियोजन नसल्याचे कधी कधी आढळून येते.

सिग्नल तोडणे, रॅश ड्राइविंग, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, मोठे हॉर्न लावणे, काळ्या काचा ठेवणे, चुकीचे पार्किंग करणे व इतर ट्रॅफिक संबंधित गुन्हे अनेक वेळा दुर्लक्ष होतात. पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, शहरात मुख्य ठिकाणांवर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत जेणेकरून नियंत्रण ठेवणे सोपे होईल परंतु उल्लंघन करणाऱ्यांवर नेमके लक्ष ठेवण्यासाठी कोणाला उपयुक्त केले आहे की नाही यावर मात्र शंका उपस्थित होत आहे.

Advertisement

या मध्ये काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येते.

काळ्या काचांवर सक्त कारवाई करण्यात आल्याचे दृश्य अगोदर दिसायचे मात्र कालांतराने ही कारवाई कमी झाली आणि उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली असं म्हणायला हरकत नाही. काळ्या काचा असल्याने गंभीर गुन्हे केले जाऊ शकतात हे आपल्याला ठाऊक आहेच, तर यावर बंदी आणण्यासाठी ट्रॅफिक पोलीस काय नियोजन याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

Related posts

१२.५%प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना परतावा द्यावा,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नाना पटोले यांनी केली पत्राद्वारे विनंती!!!: सचिन साकोरे(युवा शक्ती प्रतिष्ठान)

PC News

रहाटणी फाट्यावर ड्रेनेज चेंबर बनले वाहन चालकांसाठी धोकादायक!!!!

PC News

खाजगी शाळा ना फी साठी मनसे विध्यार्थी सेनेचा इशारा

PC News

YCM रुग्णालयास आमदार अण्णा बनसोडे यांची भेट – परिचारिकांचे केले अभिनंदन

PC News

पुणे : सचिन तेंडुलकर वर होणार का कारवाई ?

PC News

स्थानिक भाजप नेत्यांचा रडीचा डाव उघड,शहराचा विकास तर होणार १००%:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

एक टिप्पणी द्या